मच्छली येथे व्यसनमुक्ती सत्संग : युवकांना निर्व्यसनी जीवनाचा संदेश

- राष्ट्रसंत शेषराव महाराजांच्या कार्याचा आदर्श घेण्याचे प्रणय खुणे यांचे आवाहन; युवकांचा व्यसनमुक्तीचा संकल्प
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / घोट : घोटजवळील मच्छली येथे राष्ट्रसंत परमपूज्य शेषराव महाराज देवस्थान, गोंडपिपरी आणि शेषराव महाराज व्यसनमुक्ती युवक संघटना, मच्छली यांच्या संयुक्त विद्यमाने व्यसनमुक्ती सत्संग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. ग्रामीण भागातील युवकांनी व्यसनांपासून दूर राहून निरोगी, आनंदी आणि समृद्ध जीवन जगावे, तसेच व्यसनमुक्त समाजनिर्मितीसाठी पुढाकार घ्यावा, असा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.
या कार्यक्रमाला शेषराव महाराज देवस्थान, गोंडपिपरीचे कार्याध्यक्ष मुन्ना भाऊ सिडाम, चौधरी महाराज, राष्ट्रीय मानवाधिकार संघटना महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रणय भाऊ खुणे, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष भारत खटी, नाम फाउंडेशनचे विदर्भ समन्वयक उमेश पाटील, संघटनेचे जिल्हाध्यक्ष रमेश अधिकारी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती.
कार्यक्रमात मुन्ना भाऊ सिडाम, चौधरी महाराज आणि प्रणय भाऊ खुणे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. युवकांना व्यसनांपासून दूर राहण्याचे आवाहन करत व्यसनमुक्तीची चळवळ ग्रामीण भागात अधिक व्यापक करण्याची गरज व्यक्त करण्यात आली.
शेषराव महाराजांचे कार्य अतुलनीय -
मार्गदर्शन करताना प्रणय भाऊ खुणे यांनी राष्ट्रसंत शेषराव महाराज यांनी व्यसनमुक्तीसाठी केलेले कार्य अतुलनीय असल्याचे प्रतिपादन केले. युवकांनी राष्ट्रसंत शेषराव महाराजांना आदर्श मानून स्वतःचे जीवन व्यसनमुक्त करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करावेत. व्यसनांपासून दूर राहून सुखी, आनंदी आणि समृद्ध जीवन जगावे, असे आवाहन त्यांनी केले.
आजच्या सत्संग कार्यक्रमात व्यसनमुक्त होण्याचा संकल्प करणाऱ्या सर्व युवकांचे त्यांनी अभिनंदन करून त्यांचे आभार मानले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. ग्रामीण भागातील अधिकाधिक युवकांनी व्यसनमुक्त जीवनाचा संकल्प करावा, असेही त्यांनी आवर्जून सांगितले.
व्यसनमुक्तीसाठी युवकांनी पुढाकार घ्यावा -
व्यसनाधीनतेचा व्यक्तीच्या आरोग्यासोबतच कुटुंब आणि समाजावरही परिणाम होतो. त्यामुळे युवकांनी व्यसनांच्या आहारी न जाता शिक्षण, रोजगार, सामाजिक कार्य आणि सकारात्मक उपक्रमांकडे वळावे, असा संदेश कार्यक्रमातून देण्यात आला. व्यसनमुक्त समाजनिर्मितीसाठी केवळ जनजागृती न करता प्रत्यक्ष कृती करण्याची गरज असून, प्रत्येक युवकाने स्वतःपासून परिवर्तनाची सुरुवात करावी, असे आवाहन मान्यवरांनी केले.
पदाधिकारी, कार्यकर्त्यांची उपस्थिती -
कार्यक्रमाला राजूभाऊ सातपुते, संदीप भोवरे, नितेश कोहपरे, नितेश गट्टीवार, हरिदास हुलके, रोशन धोटे, शामराव तुंकलवार, आनंदराव वडेंगवार यांच्यासह मच्छली येथील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. युवकांनी व्यसनमुक्तीचा संकल्प केल्याने कार्यक्रमाला सामाजिक परिवर्तनाचा सकारात्मक संदेश मिळाला. ग्रामीण भागात व्यसनमुक्तीची चळवळ अधिक बळकट करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्या




Petrol Price




