महत्वाच्या बातम्या

 चंद्रपूर जिल्ह्यातील १ हजार ३६७ गावांची खरीप पिकांची पैसेवारी ५० पैसेपेक्षा जास्त


- ४१९ गावे ५० पैसेवारीच्या खाली
विदर्भ न्युज एक्सप्रेस 
प्रतिनिधि / चंद्रपूर : सन २०२२-२३ या वर्षाची खरीप पिकांची सुधारीत पैसेवारी जिल्हा प्रशासनाच्या वतीने प्रसिध्द करण्यात आली आहे. त्यानुसार जिल्ह्यातील १३६७ गावांची खरीप पिकांची पैसेवारी ५० पेक्षा जास्त तर ४१९ गावांची पैसेवारी ५० पैसे पेक्षा कमी आहे. तसेच पीक नसलेल्या गावांची संख्या ४७ आहे.
जिल्ह्यातील १५ तालुक्यात एकूण १८३६ गावे आहेत. यापैकी खरीप पिकांच्या गावांची संख्या १८३३ तर रब्बी पिकांच्या गावांची संख्या तीन आहे. जिल्ह्यात एकूण लागवडीखाली क्षेत्र ४ लक्ष ६५ हजार ९९४ असनू प्रत्यक्षात पेरणी केलेले क्षेत्र ४ लक्ष ५८ हजार ५२३ आहे. सन २०२२-२३ या वर्षाच्या खरीप पिकांची सुधारित पैसेवारीनुसार ५० पैसेवरील गावांची संख्या १३६७ आहे. यात बल्लारपूर तालुक्यातील ३२ गावे, राजुरा तालुक्यातील ११० गावे, कोरपना (११३ गावे), जिवती (७५ गावे), गोंडपिपरी (९८ गावे), पोंभुर्णा (७१ गावे), मूल (११० गावे), सावली (१११ गावे), चिमूर (२५८ गावे), सिंदेवाही (११४ गावे), ब्रम्हपुरी (१३७ गावे) आणि नागभीड तालुक्यातील १३८ गावांचा समावेश आहे.
जिल्ह्यात ५० पैसेपेक्षा खाली पैसेवारी असलेल्या गावांची संख्या ४१९ आहे. यात चंद्रपूर तालुक्यातील ८७ गावे, वरोरा तालुक्यातील १८३ गावे आणि भद्रावती तालुक्यातील १४९ गावांचा समावेश आहे. तर पीक नसलेल्या गावांची संख्या ४७ असून असून यात चंद्रपूर तालुक्यातील १६, राजूरा तालुक्यातील १ , जिवती तालुक्यातील ८ , मूल १ , चिमूर १ , सिंदेवाही १ , ब्रम्हपुरी ३ , वरोरा २ आणि भद्रावती तालुक्यातील १४ गावे आहेत, असे जिल्हाधिकारी कार्यालयाने कळविले आहे.





  Print






News - Chandrapur




Related Photos