अवैध दारूविक्रेत्याकडून लाच घेणे महागात पडले, पोलिस नायकाला एसीबीचे दर्शन घडले


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / भंडारा :
मोहफुलाच्या दारूविक्रीचा अवैध व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी तसेच कोणतीही कारवाई न करण्यासाठी पाच हजारांची लाच मागणारा कारधा पोलिस ठाण्यात पोलिस नायक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला आहे. सुनिल बळीराम राठोड (३०)  असे लाचखोर पोलीस नायकाचे नाव आहे. 
तक्रारदार   खमारी, मातोरा तह जि. भंडारा येथिल रहिवासी असून  तो बेकायदेशिर मोहफुलाची दारु विक्री करत असतो.   बेकायदेशिर दारु विक्री  करण्याकरीता पोलिस नायक सुनिल बळीराम राठोड हा प्रति महिना  पाच हजार रुपये घेत होता.  बेकायदेशिर मोहफुलाच्या दारू  विक्रीचा धंदा सुरू ठेवुन कोणतीही कायदेशिर कार्यवाही न करण्याकरिता तक्रारदारास प्रत्येक  महिण्याला  पाच हजार रुपयांच्या लाच रक्कमेची मागणी केली जात होती.  याबाबत सबंधित दारूविक्रेत्याने  लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, भंडारा येथे तक्रार नोंदविली. तक्रारदाराने  दिलेल्या तक्रारीवरून 11 आॅगस्ट रोजी रोजी सापळा कार्यवाहीचे आयोजन केले असता सापळा पडताळणी दरम्यान पोलिस नायक सुनिल बळीराम राठोड  याने   तक्रारदाराकडुन  पाच हजारांची  मागणी करून तडजोडअंती चार हजार रू स्विकारले. यावरून त्याच्या विरूध्द  रोजी पोलीस ठाणे  भंडारा येथे अप 630/18 कलम 7,13(1)(ड) सहकलम 13(2) लाप्रका  1988 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदर कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नागपूरचे पोलीस अधिक्षक  पी.आर. पाटील नागपुर यांच्या मार्गदर्शनात दिनकर सावरकर, पोलीस उपअधीक्षक   योगेश्वर पारधी, पोलिस हवालदार संजय कुरंजेकर, नापोशि गौतम राऊत, सचिन हलमारे, रविन्द्र गभने, पो.शि. शेखर देशकर, अश्विनकुमार गोस्वामी, पराग राऊत, कोमलचंद बनकर,   दिनेश  धार्मिक  यांनी केली  आहे.
   Print


News - Bhandara | Posted : 2018-08-13


Related Photos