गिरड प्राथमिक आरोग्य केंद्रात औषधींचा तुटवडा


- औषध उपलब्ध करण्याची मागणी  , बजरंग दलाने दिले निवेदन 
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / समूद्रपूर :
गिरड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात औषधींचा  तुटवडा निर्माण झाल्यामुळे नाइलाजास्तव तेथील वैद्यकीय अधिकारी यांना काही औषधी बाहेरून घेण्याचा सल्ला रुग्णांना द्यावा लागतो . 
परिसरातील काही तरुण व वयोवृद्ध रुग्णांनी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाद ,खाज खूजली अश्या कित्येक रोगांवर प्राथमिक आरोग्य केंद्रात औषधी नसल्या कारणाने   विश्व हिंदु परिषद चे तालुका मंत्री निर्भय पांडे यांच्याकडे समस्या विशद केली. प्राथमिक आरोग्य केंद्रात औषधी चा पुरवठा उपलब्ध नसल्याने रुग्णांना याचा त्रास होत असल्याचे लक्षात येताच बजरंग दलाच्या सर्व कार्यकर्त्यांनी याची दखल घेत प्राथमिक आरोग्य केंद्र गाठले. तेथील वैद्यकीय अधिकारी डॉ नरेंद्र वानखेडे यांच्याशी सदर विषयावर चर्चा करण्यात आली व निवेदन देऊन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ . डवले  यांच्याशी भ्रमनध्वनी वर सम्पर्क साधून सदर विषयावर चर्चा करण्यात आली.  शासनाच्या यादी प्रमाणे संपूर्ण औषधी आमच्या कडे उपलब्ध आहे.  यदा कदाचित काही औषधी नसेल तर त्याचाही पुरवठा दोन दिवसात करण्याचे आश्वासन जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी दिले.  यावेळी  पंकज तेलरांधे,  संदीप शिवणकर,  विक्की सहारे,  राकेश दीक्षित,  प्रशांत ठाकूर,  कार्तिक पारधे,  दिनेश भजभूजे,  राम शिंदे,  संदीप हजारे,  शुभम दीक्षित,  बिट्टू ठाकूर,  महेंद्र बावणे,  शुभम चामचोर,  किशोर भगत,  शुभम बावणे,  संदीप कापसे,  अतुल खाटीक,  चेतन पाखरानी , मनमित मिठीयाडू,  गणेश नांदूरकर तसेच बजरंग दलाचे  कार्यकर्ते उपस्थित होते.   Print


News - Wardha | Posted : 2018-09-28


Related Photos