भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त व्याख्यानाचे आयोजन

- आदिवासी क्रांतिकारकांच्या योगदानातून राष्ट्रप्रेम व स्वाभिमानाच्या प्रेरणेचे स्मरण
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नागपूर : क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त आयोजित जनजातीय गौरव दिवस सेवा सप्ताहाअंतर्गत भारतीय स्वातंत्र्य चळवळ व राष्ट्रनिर्माणात आदिवासी समाजाचे योगदान या विषयावर विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. आदिवासी विकास विभाग, अपर आयुक्त आदिवासी विकास, नागपूर व एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, यांच्या संयुक्त विद्यमाने व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले. यावेळी प्रमुख वक्ते डॉ. श्यामराव कोरटे उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्ष डॉ. मनाली क्षीरसागर तर डॉ.अखिलेश पेशवे, डॉ.विनय खंडारे, डॉ. विजयालक्ष्मी शेंडे यांची प्रमुख उपस्थिती उपस्थिती होती. आदिवासी समाजातील स्वातंत्र्यवीरांनी देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात दिलेले योगदान, त्यांचा संघर्ष,शौर्य, त्याग व बलिदान तसेच राष्ट्रनिर्मितीतील महत्त्वपूर्ण भूमिका याविषयी उपस्थितांनी मार्गदर्शन केले. भगवान बिरसा मुंडा यांनी आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी केलेला संघर्ष, सामाजिक जागृती आणि अन्यायाविरुद्ध उभारलेली चळवळ यांचा विशेष उल्लेख करण्यात आला.
आदिवासी समाजाचा गौरवशाली इतिहास, संस्कृती, परंपरा आणि राष्ट्राच्या उभारणीत असलेले योगदान नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात आला. आदिवासी क्रांतिकारकांच्या जीवनकार्यापासून प्रेरणा घेऊन समाजात स्वाभिमान, राष्ट्रप्रेम, सामाजिक बांधिलकी आणि जागृती निर्माण व्हावी, तसेच त्यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढ्यांनी जतन करावा या उद्देशाने व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले.
क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून त्यांच्या क्रांतिकारी विचारांना उजाळा देत आदिवासी समाजाच्या ऐतिहासिक योगदानाचे यावेळी स्मरण करण्यात आले. व्याख्यानास विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.




Petrol Price




