दहीहंडीचा बॅनर लावण्याच्या वादातून युवकाची हत्या


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / पुणे :
पुण्यामध्ये दहीहंडीचा बॅनर लावण्यावरून झालेल्या वादात पाच जणांनी तलवारीने वार करत एका २४ वर्षीय दुकानदाराची हत्या केली आहे. सदर घटना सिंहगड रोडवरील माणिकबाग येथे शनिवारी पहाटे घडली . अक्षय अशोक घडसी असे मृत तरुणाचे नाव आहे. 
पोलिसांनी निलेश चौधरी, सागर दारवटकर व त्यांच्या साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अक्षय आणि पाचही आरोपी हे एकाच भागात राहतात. त्यांच्यात दहीहंडीचा बॅनर लावण्यावरुन वाद झाला होता.
अक्षय घडसी हा किराणा दुकान चालवायचा. त्याचे धायरीत दुकान आहे. काल संध्याकाळी साडेसहाच्या दरम्यान बाहेर गेलेला अक्षय घरी परतला नाही. यानंतर मध्यरात्री अडीचच्या सुमारास पोलीस नियंत्रण कक्षाला एक तरुणाचा पेट्रोल पंपाजवळ खून झाल्याची माहिती मिळाली. यानंतर पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटली. पोलिसांनी अक्षयच्या घऱच्यांना ही माहिती.
दहीहंदीचा बॅनर लावण्याच्या वादातून पाच जणांनी मध्यरात्री अक्षयवर तलवारीने वार करुन त्याची निर्घृण हत्या केल्याचं पोलिसांच्या तपासात समोर आलं आहे. आता सिंहगड पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. पाचही आरोपी सध्या फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

   Print


News - Rajy | Posted : 2018-09-01


Related Photos