महत्वाच्या बातम्या

  गोंदिया बातम्या

सलग दुसऱ्या वर्षी इटियाडोह धरण ओव्हरफ्लो बातम्या - Gondia

सलग दुसऱ्या वर्षी इटियाडोह धरण ओव्हरफ्लो


- नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा; सांडव्यावरून १६९ क्यूसेक पाण्याचा विसर्गविदर्भ न्यूज एक्सप्रेस  तालुका प्रतिनिधी / गोंदिया : तालुक्यासह गोंदिया जिल्ह्यातील प्रमुख सिंचन प्रकल्प म्हणून ओळखले जाणारे इटियाडोह धरण सलग दुसऱ्या वर्षी ओव्हरफ्लो झाले आहे. शनिवारी २६ सकाळी ६ वाजता धरणाने पूर्ण संचय पातळी गाठल्यानंतर सांडव्यावरून पाण्याचा विसर्ग सुरू झाला. सध्या सांडव्यावरून सुमारे १६९ क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू असून, विसर्गाचे प्रमाण कमी-जास्त होण्याची शक्यता असल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे इटियाडोह जलाशयातील संचित पाणीसाठ्यात सातत्याने वाढ होत गेली. अखेर धरणाने आपली पूर्ण संचय क्षमता गाठत शनिवारी सकाळी ओव्हरफ्लो होण्यास सुरुवात केली. धरण ओव्हरफ्लो झाल्याने परिसरातील शेतकरी आणि नागरिका...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
शिवभोजन गरिबांची भूक भागवणाऱ्यांवरच उपासमारीची वेळ बातम्या - Gondia

शिवभोजन गरिबांची भूक भागवणाऱ्यांवरच उपासमारीची वेळ


- सहा महिन्यांपासून अनुदान रखडले; गोंदिया जिल्ह्यातील दोन केंद्रे बंद, केंद्रचालक आर्थिक संकटातविदर्भ न्यूज एक्सप्रेसप्रतिनिधी / गोंदिया : गोरगरीब आणि गरजू नागरिकांची भूक भागविणाऱ्या शिवभोजन केंद्रचालकांवरच आता उपासमारीची वेळ आली आहे. शासनाच्या शिवभोजन योजनेअंतर्गत गरजू नागरिकांना अवघ्या १० रुपयांत दुपारचे जेवण उपलब्ध करून दिले जाते. मात्र, १६ मार्च २०२६ पासून गेल्या सहा महिन्यांचे अनुदान केंद्रचालकांना मिळालेले नसल्याने त्यांच्यासमोरील आर्थिक अडचणी दिवसेंदिवस वाढत आहेत. अनुदानाअभावी जिल्ह्यातील दोन शिवभोजन केंद्रे बंद झाल्याची माहिती असून, उर्वरित केंद्रेही पदरमोड करून सुरू ठेवण्याची वेळ केंद्रचालकांवर आली आहे.गोंदिया जिल्ह्यात सध्या ५१ शिवभोजन केंद्रे कार्यरत आहेत. या केंद्रांवर दररोज सरासरी ५ हजार १७५ ते ५ हजार १७६ थाळ्यांचे वितरण केले जाते. त्यामुळे रोज हजारो गरजू नागरिकांना अल्पद...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
डॉक्टरच्या फ्लॅटचे कुलूप तोडून ३.४० लाखांचा ऐवज लंपास बातम्या - Gondia

डॉक्टरच्या फ्लॅटचे कुलूप तोडून ३.४० लाखांचा ऐवज लंपास


- लक्ष्मीनगरातील घटना , सोन्या-चांदीचे दागिने आणि मोत्यांचा संच चोरीला, रामनगर पोलिसांत गुन्हा दाखलविदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / गोंदिया : फ्लॅटला कुलूप लावून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कर्तव्यावर गेलेल्या डॉक्टरच्या घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने आणि मोत्यांचा संच असा एकूण ३ लाख ४० हजार ७०० रुपयांचा ऐवज लंपास केला. ही घटना ३१ ऑगस्ट रोजी गोंदियातील लक्ष्मीनगर परिसरात उघडकीस आली. डॉ. संदीप वसंतराव आंबेडकर (४४) हे मूळचे नरसाळा, नागपूर येथील रहिवासी असून सध्या गोंदियातील लक्ष्मीनगर परिसरातील न्यू लक्ष्मी बिल्डिंगमध्ये वास्तव्यास आहेत. ते शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, गोंदिया येथे वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.मिळालेल्या माहितीनुसार, ३१ ऑगस्ट रोजी सकाळी सुमारे ११ वाजता डॉ. आंबेडकर हे आपल्या फ्लॅटला कुलूप लावून नेहमीप्रमाणे शासकीय वैद्यकीय महाविद्या...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
उपविभागीय अधिकाऱ्यांच्या खुर्चीसह कार्यालयातील साहित्य जप्त बातम्या - Gondia

उपविभागीय अधिकाऱ्यांच्या खुर्चीसह कार्यालयातील साहित्य जप्त


- भूसंपादनाच्या वाढीव मोबदल्याच्या वादात न्यायालयाच्या आदेशानंतर गोंदियात कारवाई; शासकीय वाहनाचीही जप्ती होणारविदर्भ न्यूज एक्सप्रेस  प्रतिनिधी / गोंदिया : भूसंपादनाच्या वाढीव मोबदल्यावरून सुरू असलेल्या न्यायालयीन वादात गोंदिया येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयातील साहित्य जप्त करण्याची कारवाई गुरुवारी करण्यात आली. दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर यांच्या न्यायालयाच्या आदेशानंतर तक्रारदार राजू नागवंशी यांच्या वकिलांसह न्यायालयीन कर्मचारी उपविभागीय अधिकारी कार्यालयात पोहोचले. यावेळी उपविभागीय अधिकाऱ्यांची खुर्ची तसेच कार्यालयातील विविध साहित्य जप्त करण्यात आले. न्यायालयाच्या आदेशानुसार शासकीय वाहनही जप्त करायचे होते; मात्र वाहन कार्यालयाबाहेर असल्याने गुरुवारी त्याची जप्ती होऊ शकली नाही.गोंदिया शहरातील क्रीडा संकुल परिसरात राजू नागवंशी यांच्या मालकीची सुमारे ११ आर जमीन सन २००९ मध्ये भूसंपाद...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
चार वर्षांखालील मुलांना सर्दी-खोकल्याची औषधे देताना सावधान बातम्या - Gondia

चार वर्षांखालील मुलांना सर्दी-खोकल्याची औषधे देताना सावधान


- क्लोरफेनिरामाईन मॅलेट-फिनाइलेफ्राईन मिश्रणाच्या औषधांवर निर्बंध; पालकांनी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषध देणे टाळावेविदर्भ न्यूज एक्सप्रेसप्रतिनिधी / गोंदिया : चार वर्षांपेक्षा कमी वयाच्या बालकांना सर्दी आणि खोकल्यासाठी वापरल्या जाणाऱ्या विशिष्ट औषधांपासून दूर ठेवण्याचा निर्णय केंद्र सरकारच्या औषध नियामक यंत्रणेने घेतला आहे. क्लोरफेनिरामाईन मॅलेट आणि फिनाइलेफ्राईन हायड्रोक्लोराईड या घटकांचे मिश्रण असलेल्या फिक्स्ड डोस कॉम्बिनेशन (FDC) औषधांचा चार वर्षांखालील मुलांसाठी वापर करण्यास मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे लहान मुलांना सर्दी-खोकल्याची औषधे देताना पालकांनी विशेष खबरदारी घेणे आवश्यक झाले आहे.लहान मुलांना सर्दी, खोकला किंवा नाक बंद होण्याचा त्रास झाल्यानंतर अनेकदा पालक स्वतःहून औषध दुकानातून सिरप घेऊन देतात. मात्र, कमी वयाच्या बालकांमध्ये औषधांचा परिणाम वेगळ्या पद्धतीने होऊ शकतो. त्यामु...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
दुर्गम अरततोंडीची पूर्वा लोठे राज्यस्तरीय अ‍ॅथलेटिक्समध्ये अव्वल : सुवर्णपदकाची कमाई बातम्या - Gondia

दुर्गम अरततोंडीची पूर्वा लोठे राज्यस्तरीय अ‍ॅथलेटिक्समध्ये अव्वल : सुवर्णपदकाची कमाई


- चिपळूण येथील ४०व्या महाराष्ट्र राज्य ज्युनिअर अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये दमदार कामगिरी; चेन्नईतील राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवडविदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / गोंदिया : तालुक्यातील अतिदुर्गम भागातील अरततोंडी गावच्या कन्येने क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. अरततोंडी येथील रहिवासी आणि सध्या गोंदिया येथे शिक्षण घेत असलेल्या पूर्वा जगदीश लोठे हिने चिपळूण येथे झालेल्या ४०व्या महाराष्ट्र राज्य ज्युनिअर अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले.भारतीय खेळ प्राधिकरणांतर्गत चिपळूण येथे २४ ऑगस्टदरम्यान ही राज्यस्तरीय अ‍ॅथलेटिक्स स्पर्धा पार पडली. राज्यातील ३० जिल्ह्यांतील खेळाडूंनी या स्पर्धेत सहभाग घेतला. विविध क्रीडा प्रकारांमध्ये खेळाडूंनी आपले कौशल्य पणाला लावले असताना पूर्वा लोठे हिने आपल्या अष्टपैलू कामग...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
शेतीचा व्यवहार करून अडीच लाख घेतले : दुसऱ्यालाच विकली जमीन बातम्या - Gondia

शेतीचा व्यवहार करून अडीच लाख घेतले : दुसऱ्यालाच विकली जमीन


- सिरोली येथील प्रकरण; दाम्पत्याविरुद्ध पोलिसांत फसवणुकीचा गुन्हाविदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / गोंदिया : शेती विक्रीचा करार करून संबंधित खरेदीदाराकडून अडीच लाख रुपये स्वीकारल्यानंतर त्याला कोणतीही पूर्वकल्पना न देता त्याच शेतजमिनीचा व्यवहार अन्य व्यक्तीसोबत केल्याचा प्रकार अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील सिरोली येथे उघडकीस आला आहे. तसेच पहिल्या व्यवहारापोटी स्वीकारलेली रक्कमही परत न केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी अर्जुनी-मोरगाव पोलिसांनी दाम्पत्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पवन यमुदेव म्हस्के ४३ वर्ष रा. सिरोली यांच्यासोबत आरोपी जगदीश शिवकुमारसिंग पवार ५७ वर्ष आणि ममता जगदीश पवार ४५ वर्ष दोघे रा. सिरोली यांनी सिरोली येथील शेतशिवारातील गट क्रमांक २६५/४ मधील ०.२० हेक्टर आर शेती विक्री करण्याचा करार केला होता.या शेतजमिनीची एकूण किंमत ४ ला...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
इर्रीच्या झुडपी जंगलात जुगार अड्ड्यावर एलसीबीचा छापा : १९ जणांविरुद्ध गुन्हा बातम्या - Gondia

इर्रीच्या झुडपी जंगलात जुगार अड्ड्यावर एलसीबीचा छापा : १९ जणांविरुद्ध गुन्हा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / गोंदिया : तालुक्यातील इर्री येथील झुडपी जंगल परिसरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पथकाने मंगळवारी २५ ऑगस् रात्री धाड टाकून मोठी कारवाई केली. तासपत्तीवर जुगार खेळणाऱ्या १२ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले, तर पोलिसांची चाहूल लागताच तिघांनी घटनास्थळावरून पळ काढला. पकडलेल्या आरोपींकडून रोख रकमेसह मोटारसायकल, १४ अँड्रॉइड मोबाइल, चारचाकी वाहन आणि जुगाराचे साहित्य असा एकूण १२ लाख ४ हजार ५५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी जुगार अड्डा चालविणाऱ्या चौघांसह एकूण १९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिस अधीक्षक गोरख भामरे यांच्या निर्देशानुसार आणि अपर पोलिस अधीक्षक अभय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. एलसीबीचे पोलिस निरीक्षक रेवचंद सिंगनजुडे यांच्या नेतृत्वाखालील पथक जिल्ह्यातील अ...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
बिबट्याचा धुमाकूळ : तीन शेळ्या केल्या ठार बातम्या - Gondia

बिबट्याचा धुमाकूळ : तीन शेळ्या केल्या ठार


- ताडगाव परिसरात सलग चार-पाच दिवसांपासून दहशत; वन विभागाचे पथक तळ ठोकूनविदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / गोंदिया : तालुक्यातील ताडगाव परिसरात मागील चार-पाच दिवसांपासून बिबट्याने धुमाकूळ घातला असून, शनिवारी २२ वर्ष रात्री बिबट्याने गावात प्रवेश करून दोन शेळ्या व एका बोकडाचा फडशा पाडल्याची घटना घडली. तसेच काही कोंबड्यांनाही बिबट्याने ठार केल्याची माहिती आहे. या घटनेमुळे ताडगाव परिसरातील शेतकरी आणि पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.प्राप्त माहितीनुसार, ताडगाव येथील कुक्सू शिवा कापगते यांच्या घराजवळील गोठ्यात शेळ्या बांधून ठेवण्यात आल्या होत्या. शनिवारी रात्री गावकरी गाढ झोपेत असताना बिबट्याने गावात प्रवेश केला. बायपास रोडलगत असलेल्या गोठ्यात बांधलेल्या शेळ्यांवर त्याने हल्ला केला. या हल्ल्यात दोन शेळ्या व एका बोकडाचा मृत्यू झाला. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत बिबट्याने त्या...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
 विना तिकीट प्रवास करणाऱ्या १९२ प्रवाशांवर कारवाई : १.४९ लाखांचा दंड वसूल बातम्या - Gondia

 विना तिकीट प्रवास करणाऱ्या १९२ प्रवाशांवर कारवाई : १.४९ लाखांचा दंड वसूल


 - गोंदिया स्थानकासह गोंदिया-दुर्ग विभागात रेल्वेची विशेष तिकीट तपासणी मोहीम; ३४२ प्रकरणांत २ लाख १ हजार ८१५ रुपयांचा दंडविदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / गोंदिया : रेल्वेने विना तिकीट किंवा अनियमित प्रवास करण्याचा विचार करणाऱ्या प्रवाशांनी सावध होण्याची गरज आहे. दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेच्या नागपूर मंडळाकडून विना तिकीट व अनियमित प्रवासाला आळा घालण्यासाठी विशेष तिकीट तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत गुरुवारी २० आगस्ट गोंदिया रेल्वे स्थानकासह गोंदिया-दुर्ग विभागात १९२ विना तिकीट प्रवाशांवर कारवाई करून १ लाख ४९ हजार २६५ रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.विना तिकीट प्रवास रोखण्यासोबतच प्रवाशांनी रेल्वेच्या नियमांचे पालन करावे आणि नियमित तिकीट घेऊनच प्रवास करावा, या उद्देशाने ही विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. नागपूर मंडळाचे वरिष्ठ मंडळ वाणिज्य प्रबंधक दिलीप सिंग आणि...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →