महत्वाच्या बातम्या

 उष्णतेच्या तांडव, भाजयुमोच्या ३० एप्रिलपासून सर्व शाळा/महाविद्यालय तत्काळ बंद करण्याची जिल्हाधिकाऱ्यांना मागणी


- शाळांच्या विशेष दुकानां मधून गणवेश आणि साहित्य खरेदीवर कडक बंदी घालण्याची मागणी

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गोंदिया : एप्रिल महिन्यातील कडक उन्हामुळे तापमानात आधीच लक्षणीय वाढ झाली आहे. गोंदिया आणि संपूर्ण विदर्भ प्रदेश उकाड्याने होरपळत आहे. उष्माघात, निर्जलीकरण आणि उष्णतेच्या लाटांच्या जीवघेण्या परिणामांमुळे लोक घराबाहेर पडणे टाळत आहेत.

मात्र, आजकाल मुलांना शाळांमध्ये अजूनही उकाड्याचा सामना करावा लागत आहे. शाळांनी अद्याप उन्हाळी सुट्टी जाहीर केलेली नाही. खाजगी शाळांमध्ये अजूनही वर्ग सुरू असून, त्यामुळे मुलांना उष्माघाताचा धोका निर्माण झाला आहे.

तीव्र उष्णतेची लाट आणि त्याचे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम लक्षात घेता, गोंदियाचे आमदार विनोद अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाने जिल्हाधिकारी डॉ. मंगेश गोंदावले यांच्याकडे जिल्ह्यातील सर्व सरकारी आणि खाजगी शाळा/महाविद्यालये ३० एप्रिलपासून तात्काळ बंद करण्याची मागणी केली आहे.

याव्यतिरिक्त, भाजयुमो जिल्हाध्यक्ष रोहित अग्रवाल यांनी आपल्या निवेदनात मागणी केली आहे की, खाजगी शाळा सध्या स्वतःचाच एक नवीन पायंडा पाडत आहेत. खाजगी शाळांचे प्रशासक मुलांवर आणि त्यांच्या पालकांवर विशिष्ट दुकानांमधूनच शालेय गणवेश आणि शैक्षणिक साहित्य खरेदी करण्यासाठी कठोर निर्बंध लादत आहेत. हे सरकारच्या निर्णयाच्या विरोधात आहे. त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना विनंती केली आहे की, गणवेश आणि शैक्षणिक साहित्य खरेदीवर खाजगी शाळांकडून लादण्यात येणारे हे निर्बंध थांबवून पालकांना दिलासा द्यावा.

यावेळी भारतीय जनता युवा मोर्चा गोंदियाचे जिल्हाध्यक्ष रोहित अग्रवाल, जिल्हा परिषद सभापती लक्ष्मण भगत, पंचायत समिती सभापती मुनेश रहांगडाले, नगरसेवक अभय अग्रवाल, बीजेवायएमचे सरचिटणीस विक्की बघेले, अभय मानकर, संदीप श्रीवास, बिट्टू जैस्वाल, हर्ष उजवणे, ऋषभ मसानी, अविनाश सिंघानिया आदी उपस्थित होते.





  Print






News - Gondia




Related Photos