महत्वाच्या बातम्या

 सुकन्या समृद्धी योजनेच्या नियमात मोठा बदल : अर्थ मंत्रालयाकडून अधिसूचना जारी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / नवी दिल्ली : कुटुंबाचे भविष्य लक्षात घेऊन सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी, ज्येष्ठ नागरिक बचत योजना, सुकन्या समृद्धी योजना, महिला सन्मान योजना आणि पोस्ट ऑफिसमध्ये गुंतवणूक करण्यात येते. 

या योजनांमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी सरकारने नियम बदलले आहेत. सरकारद्वारे चालवल्या जाणाऱ्या या सर्व योजनांमध्ये गुंतवणूकदारांसाठी पॅन कार्ड आणि आधार कार्ड आवश्यक करण्यात आले आहेत.

यासंदर्भात अर्थ मंत्रालयाने अधिसूचना जारी केली आहे. यामध्ये म्हटले आहे की, हे बदल सरकारद्वारे जारी केलेल्या अल्प बचत योजनेसाठी केवायसी म्हणून वापरले जातील. याआधी तुम्ही या सर्व बचत योजनांमध्ये आधार क्रमांक नसतानाही पैसे जमा करू शकत होता. दरम्यान, अर्थ मंत्रालयाच्यावतीने सांगण्यात आले की, कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी गुंतवणूकदारांना आधार नोंदणी क्रमांक सादर करावा लागेल. तसेच, एका मर्यादेपेक्षा जास्त गुंतवणुकीसाठी पॅन कार्ड दाखवावे लागेल.

सहा महिन्यांच्या आत द्यावा लागेल आधार क्रमांक

पोस्ट ऑफिस बचत योजनेसाठी खाते उघडताना आधार नसल्यास, आधारसाठी नोंदणी स्लिपचा पुरावा सादर करावा लागेल. तसेच, गुंतवणूकदाराला अल्प बचत योजनेच्या गुंतवणुकीशी जोडण्यासाठी, खाते उघडल्यापासून सहा महिन्यांच्या आत आधार क्रमांक द्यावा लागणार आहे. आता अल्प बचत योजना खाते उघडताना खालील कागदपत्रांची आवश्यकता असणार आहे.

- पासपोर्ट आकाराचा फोटो

- आधार क्रमांक किंवा आधार नोंदणी स्लिप

- पॅन क्रमांक

- जर सध्याच्या गुंतवणूकदारांनी ३० सप्टेंबर २०२३ पर्यंत पॅन कार्ड आणि आधार कार्ड सादर केले नाही तर त्यांचे खाते १ ऑक्टोबर २०२३ पासून बॅन केले जाईल.





  Print






News - Rajy




Related Photos