महत्वाच्या बातम्या

 गोंंडवाना विद्यापीठात दोन दिवस राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० अंतर्गत विलुप्त होत असलेल्या बोली या विषयावर दोन दिवसीय राष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन २४ व २५ जानेवारी २०२३ रोजी इंग्रजी विभाग व आदिवासी संशोधन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात येत आहे. या राष्ट्रीय परिषदेसाठी प्रमुख वक्ता म्हणून भाषा साहित्य व संस्कृती अभ्यास विभाग, नांदेड विद्यापीठ नांदेडचे डॉ. दिलीप चव्हाण भाषा संवर्धन व जतन , डॉ. क्रिष्णा दिक्षित आंबेडकर विद्यापीठ, दिल्ली. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण व इंग्रजी भाषा, डॉ. श्रीराम गहाणे आदर्श महाविद्यालय देसाईगंज वडसा. इंग्रजी साहित्य व बोलीभाषा संवर्धन, श्री. रमेश कोरचा गोंडी भाषे समोरील आवाहने, व श्री. नंदकिशोर नैताम गोंडी भाषा व साहित्यची भुमिका या विषयावर प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शन करणार आहेत. या परिषदेत वेगवेगळ्या भाषेतील संशोधक, प्राध्यापक व विद्यार्थी सहभागी होणार आहेत आणि भारतीय भाषांचे जतन या महत्त्वाच्या मुद्द्यांवर आपले शोध पत्रे सादर करणार आहेत. असे इंग्रजी विभागातर्फे कळवण्यात आले आहे.

  Print


News - Gadchiroli
Related Photos