किंडगीपार रेल्वे फाटकाजवळ अपघात : २८ वर्षीय तरुण ठार

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गोंदिया : आमगाव तालुक्यातील किंडगीपार रेल्वे फाटकाजवळ ७ एप्रिल रोजी मध्यरात्री सुमारे १ वाजताच्या दरम्यान दुर्दैवी अपघात झाला, ज्यात २८ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. मृतकाचा परिचय आशिक राजेंद्र तावाडे (वय २८, रा. बोथली) असा आहे.
माहितीनुसार, आशिक त्या रात्री रेल्वे फाटकाजवळ जात असताना येणाऱ्या रेल्वे गाडीची जोरदार धडक बसली. या अपघातात तो गंभीर जखमी झाला आणि घटनास्थळीच ठार झाला.
सकाळी ही घटना समजल्यावर नातेवाइकांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहचून पंचनामा केला आणि मृतदेह ताब्यात घेतला. प्राथमिक तपासात मृत्यू रेल्वे गाडीच्या धडकेतून झाल्याचे निष्पन्न झाले आहे.
स्थानिक पोलिसांनी अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी आणि संभाव्य जबाबदारांची माहिती गोळा करण्यासाठी पुढील तपास सुरू केला आहे.
News - Gondia




Petrol Price




