उमा नदी संवाद यात्रा अभियानात एनएसएस शिबिरातील विद्यार्थ्यांचा सहभाग
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत ‘चला जाणुया नदिला’ अभियानाच्या माध्यमातून जिल्हा प्रशासन चंद्रपूर तसेच प्रभु फाऊंडेशन यांच्या सहकार्याने चिमुर येथील आठवले समाजकार्य महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेतील विद्यार्थ्यांनी उमा नदी संवाद यात्रा अभियानात सहभाग घेतला.
सर्वप्रथम पहिल्या दिवसाची सुरुवात शिबिरातील विद्यार्थ्यांनी काग येथील ग्रामस्थासोबत ग्रामसफाईने केले. यावेळी ग्रामस्थांनी देखील आपआपल्या घरासमोरील परिसर स्वच्छ करून संवाद यात्रेत सहभाग दर्शविले. त्यानंतर नदी संवाद यात्रेमध्ये जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी, रासेयो शिबिराचे विद्यार्थी, गुरूदेव सेवा मंडळ, भजन मंडळ, महिला बचत गट, युवक मंडळ तसेच काग येथील संपूर्ण पाणी कारभारी टीम व ग्रामस्थानी मोठ्या संखेने सहभाग घेतले. त्यासोबतच आठवले समाजकार्य महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी गुरुदेव सेवा मंडळाच्या ठिकाणी पथनाट्याद्वारे सादरीकरण करून नदी स्वछतेचे महत्व आणि नदी संवर्धन काळाची गरज हा मौलिक संदेश दिले.
संवाद यात्रेची मिरवणूक संपूर्ण गावातून काढण्यात आली. गावात ठिकठिकाणी उमा नदी संवाद यात्रेचे पारंपरिक पद्धतीने स्वागत केले. सायंकाळच्या मुख्य कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ. केदारसिंह रोटेले यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी किरण रोटेले, माजी सिनेट सदस्य, रा.तु.म. विद्यापीठ नागपुर तर प्रमुख अतिथी म्हणून उमा नदी प्रहरी सदस्य अजय काकडे, अविनाश धोंगडे, बापूराव धौंगडे उपस्थित होते. अजय काकडे यांनी शासनाच्या "चला जाणुया नदिला "अभियानाबाबत सविस्तर माहिती देऊन नदिला अमृतवाहिनी बनविन्यासाठी शासनाची भूमिका आणि लोकसहभागाबाबत मार्गदर्शन केले. अध्यक्षीय भाषणात डॉ. केदारसिंह रोटेले यांनी ग्रामीण समाजकार्य श्रम संस्कार शिबिराबाबत मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आठवले समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शुभांगी वडस्कर यांनी केले. संचालन डॉ. वीणा काकडे यांनी केले तर आभार आचल दांडेकर यांनी मानले. यशस्वीतेसाठी अंकुश बावने, कृणाल धोंगडे, अमोल धोंगडे, स्वप्नील धोंगडे, सूरज वाकडे यांच्यासह राष्ट्रीय सेवा योजनेचे शिबिरातील विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.
News - Chandrapur