भागवत सप्ताहाच्या माध्यमातून संस्काराची निर्मिती होते : खासदार अशोक नेते


- आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ इस्कॉन ता.चामोर्शी द्वारा श्रीमद् भागवत कथा सप्ताहाचे आयोजन
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / चामोर्शी : २४ फेब्रुवारी २०२४ रोज शनिवार ला सात दिवसापासून सतत कथा सप्ताह श्रीमद् भागवत कथा आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ इस्कॉन मंदिर चामोर्शी द्वारे श्रीमद् भागवत कथेचे आयोजन इस्कॉन मंदिर ता. चामोर्शी येथे करण्यात आले होते.
श्रीमद् भागवत कथा सप्ताहाचे शुभारंभ दीपप्रज्वलन व विधीवत पुजन खासदार अशोक नेते यांच्या हस्ते करण्यात आले.
या श्रीमद् भागवत कथा कार्यक्रमा प्रसंगी खासदार अशोक नेते यांनी भक्तगणांना मार्गदर्शन करतांना आजच्या काळात गुंडागर्दी, भ्रष्टाचारी, युवकांनमध्ये व्यसनाधीनता, यावर मात करायचे असेल तर अशा या श्रीमद् भागवत कथा, धार्मिक, अध्यात्मिक कार्यक्रमाचे आयोजन करणे काळाची गरज आहे.
अशा या श्रीमद् भागवत कथा सप्ताहाच्या माध्यमातून संस्काराची निर्मिती होते. याबरोबरच थोर महापुरुषांचे विचार सुद्धा अंगीकारले पाहिजे, अशा आध्यात्मिक कार्यातून आचार, विचार व संस्काराची निर्मिती होते, असे मत खासदार अशोक नेते यांनी या श्रीमद् भागवत कथा सप्ताहाच्या कार्यक्रमा प्रसंगी प्रतिपादन केले.
याप्रसंगी प्रामुख्याने खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु. जनजाती मोर्चाचे अशोक नेते, लोकसभा विस्तारक बाबुराव कोहळे, किसान आघाडी चे जिल्हाध्यक्ष रमेश भूरसे, सहकार प्रकोष्ठ जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक आशिष पिपरे, शहराध्यक्ष सोपान नैताम, इस्कॉन चे अध्यक्ष परमेश्वर दास तसेच मोठया संख्येने भगवान भक्त महिला बंधुभगिनी, युवक वर्ग, बालगोपाल उपस्थित होते.
News - Gadchiroli