मुंबईत गोवरचा उद्रेक : एक वर्षीय बालकाचा मृत्यू
- एकूण मृतांचा आकडा ४ वर
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / मुंबई : गेल्या काही दिवसात गोवर या आजराची संख्या झपाट्याने वाढत असून सोमवारी आणखी एका वर्षाच्या बाळाचा मृत्यू झाला. या आजराने कस्तुरबा रुग्णालयात झाल्याने एकूण मृतांचा आकडा ४ इतका झाला आहे. तसेच पुरळ आणि ताप अशी गोवर सदृश्य लक्षणे असलेले ६ रुग्ण उपचाराकरिता त्यांना ऑक्सिजन वर ठेवण्यात आले आहे. गेल्या वर्षभरात गोवर या आजाराचे १२६ बालकांचे निदान करण्यात आले आहे. त्यामुळे मुंबई शहरकावर गोवरचा विळखा घट्ट होत असल्याचे दिसत आहे.
सोमवारी मुंबईच्या नळ बाजारात राहणाऱ्या १ वर्षाच्या मुलाचा गोवरच्या आजाराने कस्तुरबा रुग्णलयात मृत्यू झाला असल्याचे मुंबई महानगपालिकेच्या आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे. गोवंडी परिसरात गेल्या महिन्याभरात गोवर या आजाराचे रुग्ण वाढत असल्याने मुंबई महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाने यांची गंभीर दखल घेतली आहे. तसेच याकरिता केंद्रातून तज्ज्ञाची समितीचे पथक गेले तीन दिवस पथक मुंबईत तळ ठोकून होते. त्यांनी मृताच्या नातेवाईकांशी संवाद साधला होता. त्याचप्रमाणे गोवंडी आणि त्याच्या आजूबाजूच्या परिसरातील आरोग्य केंद्रावर भेटी दिल्या होत्या. या भेटीनंतर त्यांनी राज्य सरकार आणि महापालकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून काही सूचना दिल्या होत्या.
मुंबई सह राज्यातील मालेगाव आणि भिवंडी या शहरात गोवरचे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे आरोग्य विभागाचे अधिकारी यांनी मोठ्या प्रमाणात गोवर लसीकरणाची मोहीम हाती घेऊन लोकांमध्ये जनजागृती केली जात आहे.
News - Rajy