महत्वाच्या बातम्या

 मुल शहरातील इतिहासात प्रथमच रंगणार राज्यस्तरीय कुस्ती सामन्यांचा थरार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / चंद्रपूर : क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे तसेच जिल्हा प्रशासन, चंद्रपूर, जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय तथा तालुका क्रीडा संकुल, मुल यांच्या संयुक्त विद्यमाने मुल तालुक्यामध्ये प्रथमच मुले व मुलींच्या शालेय राज्यस्तरीय कुस्ती क्रीडा स्पर्धा 8 ते 10 एप्रिल 2023 या कालावधीत मुल येथील तालुका क्रीडा संकुल प्रांगणात  आयोजित करण्यात येत आहे.

या स्पर्धेकरीता संपूर्ण महाराष्ट्रातून विविध विभागातून मुले व मुली असे एकूण 300 खेळाडू सहभागी होणार आहेत. राज्यस्तरीय शालेय कुस्ती स्पर्धा यापूर्वी रायगड जिल्ह्यात होणार होत्या. परंतु येथील खेळाडूंचा उत्साह लक्षात घेता या स्पर्धा आपल्या जिल्ह्यात मुल येथे खेचून आणण्याचे काम पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे. या स्पर्धा चंद्रपूर जिल्ह्यात प्रथमच होत आहे.

स्पर्धेचे आयोजन व नियोजन जिल्हा क्रीडा अधिकारी, चंद्रपूर आणि तालुका क्रीडा संकुल समिती, मुल यांच्या सहकार्याने होत आहे. स्पर्धेचे उद्घाटन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते 8 एप्रिल रोजी सायंकाळी 7 वाजता तालुका क्रीडा संकुलाच्या पांगणामध्ये होणार आहे. तर समारोप 10 एप्रिल रोजी सायंकाळी 7 वाजता कुस्ती महासंघाचे अध्यक्ष खासदार रामदास तडस यांच्या उपस्थित होणार आहे. या स्पर्धेचा सर्व खेळाडू व क्रीडाप्रेमींनी आनंद घ्यावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड यांनी केले आहे.





  Print






News - Chandrapur




Related Photos