महत्वाच्या बातम्या

 पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गडचिरोली : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, गडचिरोली आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्था, चामोर्शी यांच्या संयुक्त विद्यमाने २९ डिसेंबर २०२२ रोजी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, चामोर्शी, येथे पंडीत दिनदयाल रोजगार मेळावा आयोजित करण्यांत आलेला आहे.

सदर रोजगार मेळाव्याकरीता  ईच्छुक उमेदवारांनी स्वत:चा बायोडाटा, शैक्षणिक प्रमाणपत्रांच झेरॉक्स सह स्वखर्चाने २९ डिसेंबर २०२२ रोजी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, चामोर्शी येथे उपस्थित राहून रोजगार मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, गडचिरोली व औद्योगिक प्रशिक्षण संस्था, चामोर्शी, या कार्यालयाने केले आहे. अधिक माहितीकरिता जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, गडचिरोली या कार्यालयास संपर्क साधावा. दुरध्वनी क्रंमाक ०७१३२-२२२३६८ हा आहे.





  Print






News - Gadchiroli




Related Photos