गोंदियात विहिरीत बुडून तरुणाचा मृत्यू


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गोंदिया : आमगाव तालुक्यातील धावडीटोला शेतशिवारात ३५ वर्षीय चंद्रप्रकाश सेशकुमार चौधरी यांचा विहिरीत बुडून मृत्यू झाल्याची घटना १४ एप्रिल रोजी सकाळी १०:३५ वाजता उघडकीस आली. याप्रकरणी आमगाव पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
फिर्यादी पृथ्वीराज भोजलाल राहांगडाले यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी तपास सुरु केला आहे. चौधरी १३ एप्रिलपासून बेपत्ता होते.
माहितीनुसार, १४ एप्रिल रोजी सकाळी ६ वाजता गावातील नागरिक मोहा वेचण्यासाठी शेताकडे गेले असता छगनलाल पटले यांच्या शेतातील विहिरीत एक व्यक्ती पाण्यात पडलेली आढळली. ही माहिती मिळताच फिर्यादी व गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत मृतकास विहिरीतून बाहेर काढले आणि ग्रामीण रुग्णालय आमगाव येथे नेले.
परंतु, तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी चौधरी यांना मृत घोषित केले. घटना १३ एप्रिल सायंकाळी ७ वाजता सुरु झाली आणि १४ एप्रिल सकाळी १०:३५ वाजता उघडकीस आली, असे सांगण्यात आले आहे. तपास पोलिस हवालदार राजू गजापुरे करीत आहेत.
News - Gondia




Petrol Price




