लॉयड मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडच्या गडचिरोली जिल्हा जनसंपर्क अधिकारीपदी गौरव लाखे यांची नियुक्ती

- हॉटेल लँडमार्क येथील पत्रकार परिषदेत अधिकृत घोषणा
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या लॉयड मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड कंपनीने जिल्हा जनसंपर्क अधिकारीपदी गौरव लाखे यांची नियुक्ती केली आहे. आज हॉटेल लँडमार्क, गडचिरोली येथे आयोजित पत्रकार परिषदेत याबाबतची अधिकृत माहिती जाहीर करण्यात आली. पत्रकार परिषदेला जिल्ह्यातील नामांकित वृत्तसंस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
यापूर्वी या पदावर कार्यरत असलेले कार्तिक लोखंडे यांनीं इतर महत्त्वाची जबाबदारी स्वीकारल्यामुळे जनसंपर्क अधिकारी पदाचा जागा रिक्त होती.त्यामुळे कंपनीने जनसंपर्क अधिकारी म्हणून गौरव लाखे यांची निवड केली आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील कंपनीचे उपक्रम, विविध प्रशासनिक यंत्रणेशी समन्वय, सामाजिक दायित्व उपक्रमांची अंमलबजावणी आणि जनतेपर्यंत माहिती पोहोचविणे या महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या लाखे यांच्या खांद्यावर असणार आहेत.
गडचिरोली हा आदिवासीबहुल, अतिसंवेदनशील तसेच विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचा जिल्हा असल्याने सामाजिक सहभाग आणि औद्योगिक प्रगती यांचा समन्वय साधणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर गौरव लाखे यांची निवड योग्य आणि प्रभावी निर्णय असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.
कंपनीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गौरव लाखे यांना जनसंपर्क, माध्यम व्यवस्थापन, सामाजिक प्रश्न आणि स्थानिक परिस्थिती यांची उत्तम जाण आहे. विविध सामाजिक आणि माध्यम क्षेत्रातील उपक्रमांत त्यांनी यापूर्वीही सक्रिय भूमिका बजावली आहे.
नियुक्तीनंतर माध्यमांशी संवाद साधताना गौरव लाखे म्हणाले, गडचिरोलीसारख्या जिल्ह्यात काम करण्याची संधी मिळणे हा माझ्यासाठी सन्मान आहे. स्थानिकांच्या अपेक्षा आणि कंपनीच्या विकासात्मक उपक्रमांमध्ये प्रभावी समन्वय साधण्यासाठी मी कटिबद्ध आहे.
लॉयड मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडचे उपक्रम जिल्ह्याच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावतील आणि स्थानिक जनतेचा विश्वास संपादन करतील, असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला.
News - Gadchiroli




Petrol Price




