ट्रॅक्टर अपघातात मजूर ठार : चालकावर गुन्हा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गोंदिया : गोंदिया जिल्ह्यातील ईळदा ते तुकूम-सायगाव मार्गावर मंगळवारी ७ सकाळी ९:३० वाजता झालेल्या भरधाव ट्रॅक्टर अपघातात एक मजूर ठार झाला. केशोरी पोलिस ठाण्याच्या अंतर्गत घडलेली ही घटना ट्रॅक्टर चालकाच्या निष्काळजीपणामुळे झाली आहे.
स्थानीय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतक वैभव फकीर कुवर रा. ईळदा ट्रॅक्टरवरून काम करत होता. आरोपी ट्रॅक्टर चालक समीर पेसीलाल मळकाम वय १९, रा. धमदीटोला यांनी ताब्यातील ट्रॅक्टर निष्काळजीपणे चालवताना रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाला धडक दिली. धडकेनंतर वैभव ट्रॅक्टरवरून खाली पडला आणि रस्त्यावर आदळल्याने त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. उपचार सुरू करण्यापूर्वीच वैभवचा मृत्यू झाला.
हिरामन ग्यान कुवर (वय ६२, रा. ईळदा) यांनी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली. त्यानंतर पोलिसांनी आरोपी चालकाविरुद्ध गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे.
या घटनेमुळे स्थानिक परिसरात सुरक्षा नियम पाळण्याबाबत नागरिकांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. पोलिसांनी ट्रॅक्टर चालकावरील तपास वेगाने करत असल्याचे सांगितले आहे.
News - Gondia




Petrol Price




