महत्वाच्या बातम्या

 गोवंश तस्करीचा पर्दाफाश दोन आरोपी अटकेत : दोन वाहने व पाच जनावरे जप्त, मुल पोलिसांची कारवाई


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : मुल पोलिस ठाण्याच्या पथकाने सुशी–दाबगाव चौक परिसरात उभारलेल्या नाकाबंदीदरम्यान गोवंश कत्तलीसाठी नेण्यात येत असल्याची माहिती मिळताच धडक कारवाई करून पाच गोवंश जनावरे, दोन वाहने आणि दोघा आरोपींना ताब्यात घेतले असून ६ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आले.

आरोपी अब्दुल इसरार अब्दुल जलील कुरेशी (२६) , रा. दादमहल वार्ड, चंद्रपूर, संतोष रामराव थोरात (४८) , रा. शास्त्रकार लेआउट, बायपास रोड, चंद्रपूर यांना अटक करण्यात आले.

मुल पोलीस स्टेशन चे सपोनि. सुबोध वंजारी यांना १७ नोव्हेंबर रोजी रात्री गुप्त माहिती मिळाली होती की नलेश्वर–सुशी–दाबगाव मार्गे गोवंशांची अवैध वाहतूक होणार आहे. त्यानुसार पथकासह सुशी–दाबगाव चौकात नाकाबंदी केली. रात्री सुमारे ९ वाजता नलेश्वर रोडकडून संशयितरीत्या येणारी टाटा इंडीका क्रं एमएच ३४ एए २६०२ व  तिच्या मागोमाग टाटा इंट्रा पिकअप क्रं एम एच ३४ बी झेड ६९५९ येताना दिसली. 

दोन्ही वाहनांना थांबवून तपासणी केली असता पिकअप वाहनाच्या मागील भागात चार गायी व एक गोरा अशी एकूण पाच गोवंश जनावरे अतिशय निर्दयतेने कोंबून बांधलेली आढळली. तसेच कतली करीता नेत असल्याची माहिती मिळाली. पोलीसांनी ५ जनावरे तसेच दोन वाहन असे एकूण ६ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केले.

या प्रकरणात आरोपींवर महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९७६ कलम ५(अ)(ब), प्राणी क्रूरता प्रतिबंधक अधिनियम १९६० कलम ११(१)(अ)(ड)(ई)(फ), महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १९९,तसेच मोटार वाहन कायदा कलम ८३/१७७ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

सदर कारवाई मुल पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक विजय राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सुबोध वंजारी, पो हवा भोजराज मुंडरे, पोअं शंकर बोरसरे यांनी केले.





  Print






News - Chandrapur




Related Photos