अवैध रेती वाहतूक करणाऱ्या तिघांवर कारवाई : स्थानिक गुन्हे शाखेची १२.२० लाखांची मोठी जप्ती


विदर्भ न्युज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : घुग्घुस पोलिस ठाणे हद्दीत अवैधरित्या गौण खनिज (रेती) उपसा व चोरटी वाहतूक करणाऱ्या तिघांवर स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूरने आज धडक कारवाई केली. दोन ट्रॅक्टर-ट्रॉलीसह एकूण १२ लाख २० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
गोपनीय माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून दोन ट्रॅक्टर-ट्रॉली पकडल्या. तसेच आरोपी सुंदर रामचंद्र कुकडे, मनोज सुरेश झाडे, राकेश भाऊराव गोर तिघेही रा. वढा, घुग्घुस यांना अटक करण्यात आले.
अवैध वाहतूक करण्यासाठी वापरलेले दोन्ही ट्रॅक्टर-ट्रॉली किंमत अंदाजे १२ लाख रुपये, तसेच एकूण २ ब्रास रेती किंमत २० हजार रुपये, असा मिळून १२ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपींविरुद्ध पोलीस स्टेशन घुग्घुस येथे अपराध क्र. २२०/२०२५ नोंदविण्यात आला असून कलम ३०३(२), ३(५) भारतीय न्याय संहिता २०२३, तसेच म.ज.म.स. कलम ४८(७), ४८(८) व मोटार वाहन कायदा कलम १७७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर ची कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात पोउपनि संतोष निंभोरकर, पोउपनि सर्वेश बेलसरे, पोहवा नितीन कुरेकार, गणेश भोयर, सचिन गुरनुले, पोअं प्रदीप मडावी, अजित शेन्डे यांनी केले.
News - Chandrapur




Petrol Price




