महत्वाच्या बातम्या

 गडचिरोली नगरपरिषदेत नामनिर्देशन छाननी प्रक्रिया पूर्ण : ८ नगराध्यक्ष आणि १३५ नगरसेवकांचे अर्ज पात्र


- ५ नगराध्यक्ष तर ३३ नगरसेवक पदाच्या उमेदवाराचे अर्ज अपात्र

- निवडणुकीची लढत रंगणार अधिक चुरशीची

विदर्भ न्युज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : नगरपरिषद निवडणुकीसाठी दाखल झालेल्या नामनिर्देशन अर्जांची छाननी आज पार पडली. छाननीदरम्यान काही अर्जांमध्ये अपूर्ण माहिती, आवश्यक कागदपत्रांचा अभाव आदी कारणांमुळे मोठ्या प्रमाणावर अर्ज बाद करण्यात आले. त्यामुळे निवडणुकीतील उमेदवारांची संख्या लक्षणीयरीत्या कमी झाली आहे.

नगराध्यक्ष या एकाच पदासाठी एकूण १३ अर्ज दाखल झाले होते. यापैकी ०५ अर्ज अपात्र ठरवण्यात आले असून ०८ अर्ज पात्र ठरले आहेत. त्यामुळे नगराध्यक्ष पदासाठी आठ उमेदवारांत चुरशीची लढत रंगणार आहे.

त्याचप्रमाणे नगरसेवक पदासाठी दाखल झालेल्या १६८ अर्जांपैकी ३३ अर्ज अपात्र ठरले असून १३५ अर्जांची वैधता छाननी समितीने मान्य केली आहे. काही उमेदवारांनी आवश्यक पुरावे सादर न केल्याने त्यांचे अर्ज बाद झाल्याचे समजते.

छाननी प्रक्रियेनंतर आता अंतिम स्पर्धेत उतरलेल्या उमेदवारांना प्रचाराला वेग देण्यासाठी हिरवा कंदील मिळाला आहे. नागरिकांमध्येही निवडणुकीबाबत उत्सुकता वाढली असून अनेक प्रभागात उमेदवारांची चढाओढ रंगतदार बनली आहे.





  Print






News - Gadchiroli




Related Photos