महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयात राज्यस्तरीय शोतोकॉ कराटे स्पर्धा उत्साहात


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयात २० सप्टेंबर २०२६ रोजी राज्यस्तरीय शोतोकॉ कराटे चॅम्पियनशिप स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत सुमारे २०० विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी शोतोकॉ कराटे महाराष्ट्राचे अध्यक्ष सेन्साई प्रशांत पिंपळे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. राज्यस्तरीय स्पर्धेत विविध वयोगटांतील खेळाडूंनी कराटे कौशल्याचे सादरीकरण केले. स्पर्धेच्या माध्यमातून खेळाडूंना आपले कौशल्य सिद्ध करण्याची तसेच आगामी राष्ट्रीयस्तरीय स्पर्धेसाठी पात्र होण्याची संधी मिळाली.
आगामी राष्ट्रीयस्तरीय शोतोकॉ कराटे स्पर्धा उज्जैन येथे होणार असून, या स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या खेळाडूंनी अधिकाधिक पदके मिळवावीत, या उद्देशाने प्रशिक्षण व मार्गदर्शन करण्यात येणार आहे. राज्यस्तरीय स्पर्धेच्या यशस्वी आयोजनामुळे कराटेपटूंमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
स्पर्धेत पंच म्हणून विकास देशभ्रतार, शमशीर शेख, सिंधू कुशवाह, स्वप्निल डंभारे, मनोज डे, गुलाम अहमद शेख यांनी केले. तसेच आयोजन प्रशिक्षक वैष्णवी पिंपळे, सोनम कुशवाह , नेहा श्रीवास्तव, पायल, प्रवीण, मुकेश , बंडू , शीतल , मुफीज, ठाकरे, मोनिश, संदीप यांनी परिश्रम घेतले




Petrol Price




