महत्वाच्या बातम्या

 नागपूर जिल्ह्यातील पंचायत समिती सभापती पदाचे आरक्षण जाहीर


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / नागपूर : जिल्हा परिषद अध्यक्ष पदाचे आरक्षण नुकतेच जाहीर झाले असून आज जिल्ह्यातील 13 पंचायत समितीचे सभापती पदाचे आरक्षण जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी सोडत पध्दतीने जाहीर केले आहे. उपजिल्हाधिकारी (निवडणूक) मिनल कळसकर यावेळी उपस्थित होत्या.

13 पंचायत समिती सभापती पदांपैकी कुही व नागपूर (ग्रामीण) अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव असून कुही अनुसूचित जाती (महिला) साठी आरक्षित आहे.

नरखेड व कळमेश्वर पंचायत समिती सभापती पद अनुसूचित जमातीकरिता राखीव असून कळमेश्वर अनुसूचित जमाती (महिला) साठी राखीव आहे.

उमरेड व काटोल पंचायत समिती सभापती पद नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी राखीव असून उमेरड नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) साठी आरक्षित आहे.

उर्वरित 7 पंचायत समिती सभापती पद सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव असून सावनेर, पारशिवनी, मौदा व रामटेक सर्वसाधारणसाठी आहेत तर भिवापूर, कामठी, हिंगणा सर्वसाधारण (महिला) साठी आरक्षित आहेत.

ही आरक्षण सोडत शालेय मुलींच्या हाताने करण्यात आली असून जिल्हा परिषद अध्यक्षा रश्मी बर्वे, सामाज कल्याण सभापती नेमावली माटे, सभापती उज्वला बोढारे तसेच जिप व पंस सदस्य यावेळी उपस्थित होते.





  Print






News - Nagpur




Related Photos