प्रत्येक भारतीय नागरिकाला आधार कार्ड, पॅन कार्ड लिंक करणे बंधनकारक
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / मुंबई : देशातील पॅन कार्ड धारकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. सरकारने प्रत्येक भारतीय नागरिकाला आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक करणे बंधनकारक केले आहे. सरकारने यापूर्वीच पॅन कार्ड लिंक करण्यास सांगितले होते.
त्यामुळे तुम्ही अजूनही पॅन कार्ड लिंक केले नसेल तर तुमचे पॅन कार्ड बाद करण्यात येईल. असे झाल्यास तुम्हाला आर्थिक व्यवहार करताना अडचणी येऊ शकतील. त्यामुळे आजच तुमचे पॅन कार्ड लिंक करा.
अलीकडेच प्राप्तिकर विभागाने आधार-पॅन लिंकिंगबाबत इशारा दिला आहे. इन्कम टॅक्सने आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे . आयकर कायदा, 1961 नुसार, सर्व पॅन धारकांसाठी आधारशी लिंक करण्याची शेवटची ३१ मार्च २०२३ आहे, जे सवलत श्रेणीमध्ये येत नाहीत. पॅन लिंक न केल्यास ते निष्क्रिय केले जाईल. त्यासाठी उशीर करू नका, आजच लिंक करा
या मुदतीपूर्वी तुम्ही तुमचे पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक केले नाही तर. या स्थितीत तुमचे पॅन कार्ड निष्क्रिय केले जाईल.
पॅन कार्ड निष्क्रिय केल्यानंतर, तुम्ही म्युच्युअल फंड, शेअर बाजारात गुंतवणूक करू शकणार नाही किंवा बँक खात्यात तुमचे खाते उघडू शकणार नाही. याशिवाय, तुम्ही तुमचे पॅन कार्ड कोणत्याही दस्तऐवज म्हणून वापरू शकणार नाही.
पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक करण्याची प्रक्रिया अगदी सोपी आहे. यामध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागणार नाही. यासाठी तुम्हाला https://www.incometax.gov.in या वेबसाइटला भेट द्यावी लागेल. येथे जाऊन तुम्ही तुमचे पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक करू शकता.
News - Rajy