महत्वाच्या बातम्या

 नागपूर जिल्ह्यातील २३७ ग्रामपंचायतींसाठी १८ डिसेंबरला होणार मतदान


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर : नागपूर जिल्ह्यातील १३ तालुक्यातील २३७ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी १८ डिसेंबर रोजी मतदान घेण्यात येणार आहे. तर २० डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. अनुसूचित जाती २३, अनुसुचित जमाती (महिला) १८, अनुसुचित जमाती १३, अनुसुचित जमाती (महिला)८, ना.मा.प्र.२४, ना.मा.प्र.(महिला) ३५, सर्वसाधारण६१, सर्वसाधारण महिला ५५ अशा एकूण २३७ ग्रामपंचायतींमध्ये मतदान होणार आहे.
जिल्ह्यातील भिवापूर तालुक्यातील १०, कळमेश्वर २३, कामठी२७, काटोल २७, कुही ४,मौदा २५, नागपूर (ग्रामीण) १९, नरखेड २२, पारशिवनी २२, रामटेक ८, सावनेर ३६, उमरेड ७, हिंगणा ७ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. ऑक्टोबर ते डिसेंबर २०२२ या कालावधीत मुदत संपणा-या ग्रामपंचायती, नव्याने स्थापित ग्रामपंचायती तसेच समर्पित आयोगाच्या अहवालात दिसत नसल्यामुळे मागील निवडणुकांमधून वगळलेल्या ग्रामपंचायतींच्या (सदस्य पदासह थेट सरपंच पदाच्या) सार्वत्रिक निवडणुका घेण्यात येणार आहे. मतदान १८ डिसेंबर रोजी घेण्यात येणार आहे. मतमोजणी व निकाल २० डिसेंबर रोजी घोषित करण्यात येणार आहे.
नागपूर जिल्हयासह राज्यातील ३४० तालुक्यातील ७७१५ ग्रामपंयातीसाठी सदस्य पदासह थेट सरपंच पदाच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.





  Print






News - Nagpur




Related Photos