महत्वाच्या बातम्या

 अण्णाभाऊ साठे महामंडळाच्या थेट कर्ज योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / वर्धा : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्यावतीने थेट कर्ज योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या लाभार्थ्यांनी २ डिसेंबर पर्यंत महामंडळाच्या कार्यालयात अर्ज सादर करुन योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापकांनी केले आहे.

थेट कर्ज योजनेचा लाभ घेऊ इच्छिणारा लाभार्थी अनुसूचित जातीतील मांग, मातंग या समाजातील बारा पोट जातीतील असावा. लाभार्थ्यांस १ लक्ष रुपयांपर्यंतचे कर्ज प्रकरणे मंजूर करण्यात येणार आहेत. यात ८५ टक्के महामंडळाचा सहभाग, १० टक्के अनुदान व ५ टक्के लाभार्थ्यांचा सहभाग असणार आहे. यावर कर्जपरतफेडीवर ४ टक्के व्याज आकारण्यात येणार आहे. यासाठी परतफेडीचा कालावधी ३ वर्षाचा असणार आहे. योजनेबद्दल अधिक माहितीसाठी महामंडळाच्या कार्यालयास संपर्क साधावा, असे महामंडळाच्यावतीने कळविण्यात आले आहे.

  Print


News - Wardha
Related Photos