महत्वाच्या बातम्या

 खा. अशोक नेते यांनी केलेल्या सततच्या मागणीला व प्रयत्नाला अखेर यश


- सि.टि.-वन नरभक्षक वाघ अखेर जेरबंद 

- ना. सुधिर मुनगंटीवार वनेमंत्री, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय म. रा. यांच्याकडे केलेल्या सततच्या पाठपुराव्याला अखेर यश 

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गडचिरोली : खासदार अशोक नेते यांनी सततच्या केलेल्या मागणीला व प्रयत्नाला अखेर यश आले आहे. जिल्ह्यात धुमाकूळ घालुन अनेकांचा बळी घेणारा सी. टि. वन हा नरभक्षक वाघ अखेर जेरबंद झाल्याने केलेल्या सततच्या मागणीला व प्रयत्नाला अखेर यश आले.

ना. सुधिर मुनगंटीवार यांच्याकडे केलेल्या सततच्या पाठपुराव्याला अखेर यश आल्याने जिल्ह्यात अनेकांचा बळी घेणारा सी.टि.वन हा नरभक्षक वाघ अखेर जेरबंद झाला. त्यामुळे याप्रसंगी मंत्री महोदय सुधिर मुनगंटीवार यांचे व वनविभागातील अधिकाऱ्याचे सुद्धा मी मनापासून, हृदयातून, अंतकरणातून आभार व्यक्त केले आहे.

गडचिरोली, अमिर्झा, आरमोरी, पोरला, वडसा, कुरखेडा, ब्रम्हपुरी या वनपरिक्षेत्राअंतर्गत शेतशिवारात शेतीच्या कामासाठी, कुणी गुरेढोरे राखण्यासाठी गेलेले गुराखी, मोटारसायकल ने रस्त्याने जात असणारे वाटेकरी अशा अनेक व्यक्तींवर दबा धरुन बसलेल्या पटेदार वाघाने अचानक हल्ला करून अनेक व्यक्तींचा बळी घेतलेला आहे. या परिसरात वाघाने खूप धुमाकूळ घालुन शेतकरी, शेतमजूर, नागरिक यांच्यात खूप दहशत निर्माण झाली होती. त्यामुळे गडचिरोली चिमुर लोकसभा क्षेत्राचा खासदार म्हणून नरभक्षक वाघ सि.टी -वन हा जेरबंद झाल्याचे समाधान व्यक्त केलेल्या जात आहे.

तसेच सी.टि.वन या नरभक्षक वाघाला जेरबंद करण्यासाठी ताडोबा, नवेगांव बांध, नागझिरा या टीमने सुद्धा याप्रसंगी खूप मौलाची कामगिरी केल्याने कौतुक केले जात आहे.

Facebook    Twitter      
  Print


News - Gadchiroli | Posted : 2022-10-13
Related Photos