महत्वाच्या बातम्या

 दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी नगराध्यक्ष निंबोरकर दाम्पत्याकडून २.५१ लाखांची देणगी


- मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे धनादेश सुपूर्द; सामाजिक बांधिलकीचे केले दर्शन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकरी बांधवांना आर्थिक संकटातून दिलासा मिळावा, त्यांच्या अडचणीच्या काळात त्यांना भक्कम आधार मिळावा आणि संकटग्रस्त शेतकरी कुटुंबांच्या पाठीशी समाजाने खंबीरपणे उभे राहावे, या उदात्त सामाजिक भावनेतून गडचिरोलीच्या नगराध्यक्ष अ‍ॅड. प्रणोती सागर निंबोरकर तसेच नगरसेवक सागर निंबोरकर यांनी सामाजिक बांधिलकी जपत मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी २ लाख ५१ हजार रुपयांची देणगी दिली. राज्याचे मुख्यमंत्री मा. ना. श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची गडचिरोली येथे भेट घेऊन नगराध्यक्ष अ‍ॅड. प्रणोती सागर निंबोरकर व नगरसेवक सागर निंबोरकर यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी दोन लाख एकावन्न हजार रुपयांचा धनादेश त्यांच्याकडे सुपूर्द केला. राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकरी बांधवांना मदतीचा हात देण्याच्या उद्देशाने केलेल्या या आर्थिक योगदानातून सामाजिक संवेदनशीलता, दातृत्व आणि शेतकरी बांधवांप्रती असलेली आत्मीयता अधोरेखित झाली.

शेतकरी हा आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा असून, आपल्या कष्टातून तो संपूर्ण समाजाचे भरणपोषण करतो. मात्र, निसर्गाच्या लहरीपणामुळे निर्माण होणारी दुष्काळी परिस्थिती, पाण्याची टंचाई, पिकांचे नुकसान आणि आर्थिक विवंचना यामुळे शेतकरी बांधवांना अनेक संकटांचा सामना करावा लागतो. अशा कठीण प्रसंगी शेतकऱ्यांना केवळ सहानुभूतीची नव्हे, तर प्रत्यक्ष मदतीची आणि भक्कम आधाराची आवश्यकता असते.

याच सामाजिक जाणिवेतून अ‍ॅड. प्रणोती सागर निंबोरकर व सागर निंबोरकर यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी आर्थिक योगदान देण्याचा स्तुत्य निर्णय घेतला. या माध्यमातून दुष्काळग्रस्त शेतकरी बांधवांच्या मदतकार्यात आपलाही खारीचा वाटा असावा, ही त्यामागील उदात्त भावना आहे. त्यांच्या या पुढाकारामुळे सामाजिक उत्तरदायित्व जपण्याबरोबरच समाजातील इतर घटकांनाही गरजूंच्या मदतीसाठी पुढे येण्याची प्रेरणा मिळणार आहे.





  Print






Related Photos