दारूच्या नशेत नवऱ्यानेच आवळला बायकोचा गळा


- दारुड्या नवऱ्याला अटक 
- वर्धा जिल्ह्यात दारूबंदीचे असेही निघताहेत धिंडवडे 
विदर्भ न्यूज एक्सप्रेस  
जिल्हा प्रतिनिधी /  वर्धा
: जिल्ह्यात  एकुर्ली येथे   नवऱ्यानेच दारूच्या  नशेत बायकोचा गळा दाबून खून केल्याची घटना घडली आहे.
अल्लीपुर पोलीस स्टेशन मध्ये येणाऱ्या एकुर्ली येथे  भोला खोंड  (३५)   याने दारू पीऊन त्याची पत्नी  कल्पना हिच्या सोबत वाद घातला .वाद  इतका विकोपाला गेला की  पत्नीची गळा दाबुन हत्या करण्यात  आली .पोलिसांनी  आरोपीला अटक केली  आहे .  घटना स्थळी ठानेदार प्रवीन डांगे व इतर कर्मचाऱ्यांनी जाऊन  पंचनामा केला.  आरोपी वीरूध्द कलम ३०२  अनयवे गुन्हा नोंद केला आहे . दारूच्या नशेत  घडणाऱ्या घटना वर्धा जिल्ह्यात वाढल्या आहेत . जिल्ह्यात दारूबंदी असतांना या घटनेमुळे पुन्हा दारूबंदीचे धिंडवडे  निघाले आहेत.  Print


News - Wardha | Posted : 2018-08-25


Related Photos