महत्वाच्या बातम्या

 धक्कादायक : जन्मांनंतर ५ व्या दिवशी नवजात मुलीला आली मासिक पाळी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / नवी दिल्ली : अवघ्या पाच दिवसांच्या मुलीला मासिक पाळी आल्याची धक्कादायक घटना घडल्याची माहिती समोर येत आहे, कोणाचाही विश्वास बसणार नाही पण हा सगळा प्रकार घडलाच कसा असा प्रश्न सर्वाना पडला. सगळीकडे सध्या या घटनेची चर्चा सुरु आहे.

अंगावर शहरे आणणारा हा भयंकर प्रकार चीन मध्ये घडला. चीन मध्ये राहणाऱ्या एका महिलेने काही दिवसांपूर्वी एका बालिकेला जन्म दिला. सुरवातीला सगळे काही नॉर्मल होते. मात्र पाच दिवसानंतर असे काही घडले कि सर्वानाच धक्का बसला.  आपल्या पाच दिवसांच्या मुलीला पिरियड्स आल्याचे कळताच जन्मदात्या आईच्या अंगावरच काटा आला. ताबडतोब मुलीला हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. 

हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर डॉक्तरांनी या मुलीला तपासले आणि सर्वाना घाबरण्याचे काहीही कारण नसल्याचे सांगितले. या प्रकाराला निओनेटल मेंस्ट्रुएशन म्हणजेच नवजात बाळाला पिरीयडस येणे असे म्हणतात.

सर्वकाही तपासल्यानंतर डॉक्टरानी यामागचे कारण सांगितले, ते म्हणाले गर्भधारणेच्या शेवटच्या महिन्यांमध्ये काही वेळा भ्रुणाच्या शरीरात इस्ट्रोजेन जाते. तेच इस्ट्रोजेन बाळाच्या योनीतून बाहेर पडते. ज्यामुळे पिरियडस आले असे वाटते पण हे फक्त आठवडाभरच असते. बाळाच्या शरीरातून पुर्णपणे इस्ट्रोजेन बाहेर पडले की ब्लिडींग येणे बंद होते.

अश्या प्रकारच्या घटना घडल्या तर घाबरून जाऊ नका, हि अगदी सामान्य प्रकार आहे  ही एक साधारण गोष्ट आहे. गैरसमजावर जाऊ नका, मात्र सध्या  सगळीकडे या घटनेची जोरदार चर्चा सुरु आहे.

  Print


News - World
Related Photos