महत्वाच्या बातम्या

 महाराष्ट्र पोलीस भरतीत तृतीयपंथीयांनाही स्थान मिळणार? : मुंबई हायकोर्टाचा मोठा निर्णय


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / मुंबई :  तृतीयपंथीयांच्या पोलिस भरतीचा मार्ग लवकरच मोकळा होणार आहे.  केवळ धोरण नाही म्हणून पोलीस भरतीत तृतीयपंथीयांना डावलणे अयोग्य असल्याचे मत मुंबई हायकोर्टाने व्यक्त केले आहे. भरतीत तृतीयपंथीयांनाही स्थान मिळावे असे निर्देश मुंबई हायकोर्टाचे राज्य सरकारला दिले आहेत. पोलीस भरतीत लवकरच तृतीयपंथीयांनाही स्थान मिळण्याची शक्यता आहे. कारण, गृह विभागाच्या वतीने करण्यात येणाऱ्या भरती प्रक्रियेत तृतीयपंथीयांनाही स्थान मिळावे, असे निर्देश मुंबई हायकोर्टाने दिले. 

याबाबत मॅटने दिलेल्या आदेशाच्या बाजूने हायकोर्टाने मत व्यक्त केले. मॅटच्या आदेशाविरोधात सरकारने कोर्टात धाव घेतली. तेव्हा हायकोर्टाने राज्य सरकारला फटकारल आहे. पोलीस भरतीत केवळ धोरण नाही म्हणून तृतीयपंथीयांना डावलणे अयोग्य आहे, असे कोर्टाने सांगितले.

गृह विभागात भरती प्रक्रियांमध्ये तृतीयपंथीयांनाही स्थान मिळायलाच पाहिजे असे स्पष्ट मत मुंबई उच्च न्यायालयाने सुनावणी दरम्यान मांडले आहे. या संदर्भात मॅटने दिलेल्या आदेशाशी आम्ही प्रथमदर्शनी सहमत असल्याचा मत हायकोर्टाने व्यक्त केले आहे.

मॅटच्या तृतीयपंथी यांच्या संदर्भातला निर्णय विरोधात राज्य सरकारने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यावर तातडीची सुनावणीसाठी राज्य सरकार तर्फे विनंती करण्यात आली आहे. गृह विभागाच्या अंतर्गंत येणाऱ्या सर्व भरती प्रक्रियेत तृतीयपंथीयांसाठीही (ट्रान्सजेंडर) पर्याय ठेवणे अनिवार्य करा.

महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाने (मॅट) नुकत्याच दिलेल्या आदेशाशी प्रथमदर्शनी आम्ही सहमत आहोत असे कोर्टाने म्हंटले आहे. राज्याच्या पोलीस दलातील भरतीप्रक्रियेत स्त्री- पुरुषांप्रमाणे तृतीयपंथीयांना केवळ धोरण नाही म्हणून डावलणे हे अयोग्य आहे अस मत व्यक्त करत मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले आहे.





  Print






News - Rajy




Related Photos