आष्टी - आलापल्ली मार्गावर अपघात, एक जण ठार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / आष्टी :
पायी जात असलेल्या इसमास दुचाकीस्वाराने दिलेल्या धडकेत इसम ठार  झाल्याची घटना काल रविवार १९ ऑगस्ट रोजी रात्री ७.३० वाजताच्या सुमारास  आष्टी - आलापल्ली मार्गावर महात्मा फुले हायस्कुलच्या समोर घडली.  गोविंद सुभाष रॉय असे उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. 
 आलापल्ली कडून गोंडपिपरीकड़े जाणाऱ्या एमएच ३४ व्ही २५८४  या क्रमांकाच्या दुचाकिने पायी जाणाऱ्या गोविंद सुभाष रॉय याला जोरदार धड़क दिली.  या अपघातात त्याच्या डोक्याला मार लागून तो गंभीर जखमी झाला.  त्याला आष्टी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकुति चिंताजनक असल्यामुळे त्याला पुढील उपचारासाठी चंद्रपुर येथे रुग्णालयात हलविण्यात आले.  परंतु त्याची प्रकृति गंभीर व चिंताजनक अल्यामुळे गोविंद शुभाष रॉय याचा चंद्रपुर येथे उपचारदरम्यान मृत्यु  झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे.   दुचाकी चालक नागेश बाजीराव विटेकर रा.गोंडपिपरि जिल्हा चंद्रपुर हा किरकोळ जखमी झाला असून त्याच्यावर आष्टी ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहे . त्याच्यासोबत असलेला एक व्यक्ती  अपघात होताच घटनास्थळावरुण फसार झाला आहे.  अधिक तपास आष्टी पोलिस करीत आहेत. 



  Print






News - Gadchiroli | Posted : 2018-08-20






Related Photos