भामरागड येथे पोलीस विभागाच्या वतीने रक्तदान शिबीर : ३५ रक्तदात्यांनी केले रक्तदान


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / भामरागड : 
पोलीस स्टेशन , भामरागड येथे गणेश उत्सवा निमित्य  उपविभागीय पोलिस अधिकारी बरडे यांच्या मार्गदर्शनाखाली रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. 
याप्रसंगी उपविभागीय पोलिस अधिकारी  बरडे यांनी रक्तदानाचे महत्व पठवुन देऊन स्वतः रक्तदान केले. पोस्टे भामरागड चे कर्मचारी , एसआरपीएफ चे अधिकारी व कर्मचारी सीआरपीएफ बटालियन ३७ चे अधिकारी व कर्मचारी तसेच क्यूआरटी भामरागडचे कर्मचारी , भामरागड पत्रकार तालुका संघाचे अध्यक्ष  परसलवार असे एकूण ३५ जणांनी रक्तदान केले.  
यावेळी सीआरपीएफ चे पोलीस निरीक्षक परविन्दर कुमार   ,सीआरपीएफ चे पीआय पुसाम  ,क्यूआरटी  भामरागडचे प्रभारी अधिकारी होणमणे , पोलीस स्टेशन भामरागडचे प्रभारी अधिकारी सुसतकर , पोउपनी झोल  उपस्थित होते. रक्तदान झाल्यानंतर सर्व रक्तदात्यांना चहा , नाश्ता , बिस्किट व केळीचे वाटप करण्यात आले.   Print


News - Gadchiroli | Posted : 2018-09-18


Related Photos