चामोर्शी तालुक्यातील ईल्लूर येथील तरुणीचा विहीरित पडून मृत्यू


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / आष्टी : चामोर्शी तालुक्यातील ईल्लूर येथील एका तरुणीचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची घटना आज १४ नोव्हेंबरला सकाळी सात वाजताच्या दरम्यान घडली. मृतक तरुणीचे नाव सुप्रिया सुभाष कुबळे (१६) रा.ईल्लूर असे आहे.
सदर तरुणी सकाळी पाणी आणण्यासाठी अशोक पातर यांच्या घराजवळ असलेल्या शासकीय विहीवर गेली होती. ती पाणी काढत असतांना विहिरीत कोसळली तेव्हा विहीरी जवळ असलेल्या लोकांना आवाज आल्याने त्याठिकाणी धाव घेऊन त्या तरुणीला वाचविण्यासाठी प्रयत्न केला. मात्र प्रयत्न करुनही यश आले नाही. शेवटी तीचा मृतदेह बाहेर काढावे लागले. सुप्रिया ही महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय आष्टी येथील माजी विद्यार्थीनी तसेच धनुर्विद्या सेंटरची खेळाडू होती. घटनेची माहिती आष्टी पोलीस स्टेशनला देण्यात आली. लागलीच पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी ग्रामीण रुग्णालय आष्टी येथे पाठविण्यात आला. शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. अधीक तपास पोलिस निरीक्षक कुंदन गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली आष्टी पोलिस करीत आहे.
News - Gadchiroli




Petrol Price




