कमलापूरात नक्षल्यांनी बांधले बॅनर, २१ सप्टेंबर रोजी नक्षल स्थापना दिन साजरा करण्याचे केले आवाहन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / कमलापूर :
अहेरी तालुक्यातील कमलापूर येथे नक्षल्यांनी बॅनर तसेच पत्रके लावले असून २१ सप्टेंबर रोजी माओवाद्यांचा १४ वा स्थापना दिवस गावा - गावात उत्साहात साजरा करावा, असे आवाहन नक्षल्यांनी केले आहे.
नक्षल्यांनी बॅनर, पत्रकातून भाजपा, संघ सरकार चालविले जात आहे. यामुळे लुट, शोषण केले जात असून जनतेला मुक्त करण्यासाठी जनयुध्द तिव्र करा, अशाप्रकारचा मजकूर लिहीलेला आहे. पत्रकांवर अहेरी एरिया कमिटी भाकपा माओवादी असे नमुद करण्यात आले आहे.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2018-09-19


Related Photos