महत्वाच्या बातम्या

 आष्टी येथे जिल्हा स्तरीय शालेय बुडो मार्शल आर्ट स्पर्धा संपन्न


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / आष्टी : क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय गडचिरोली आणि गडचिरोली जिल्हा बुडो मार्शल आर्ट संस्था आष्टी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हा स्तरीय शालेय बुडो मार्शल आर्ट स्पर्धा बुडो प्रशिक्षक कपिल मसराम व विलास मूत्तेवार यांच्या मार्गदर्शनाखाली सावित्रीबाई फुले उच्च प्राथमिक शाळा आष्टी येथे दिनांक २९ आक्टोबर २०२२ रोज शनिवारला संपन्न झाले.
जिल्हा स्तरीय शालेय बुडो मार्शल आर्ट स्पर्धेला अध्यक्षस्थनी म. ज्योतिबा फुले वरिष्ठ महाविद्यालययाचे शारीरिक शिक्षण प्रमूख प्रा. श्याम कोरडे तर उदघाटक म.ज्योतीबा फुले हाय स्कूल आष्टी चे शारीरिक शिक्षक सूशिल अवसरमोल तर प्रमूख पाहूणे म्हणून श्री. छत्रपती शिवस्वराज्य सेवा संस्था आष्टी चे अध्यक्ष पवन रामगिरकर, उपाध्यक्ष संदीप तिवाडे, अक्षय हनमलवार, रितीक पांढरमिसे उपस्थित होते. सदर स्पर्धेत मुख्य पंच अनिकेत हजारे व शूभम गांधारे यांनी तर मुख्य परिक्षक आचल अलोणे, चिरंजीव कारकूरवार, राज दुर्गे, यश बामणकर आणि टेबल आफिशीयल  अक्षता लांबाडे, गायत्री झाडे, काजल वाघाडे यांनी काम पाहिले या स्पर्धेतील विजयी खेळाडू यांना डिसेंबर महिन्यात नागपूर येथे होणाऱ्या विभागीय शालेय बुडो मार्शल आर्ट स्पर्धेसाठी निवड झालेली आहे.

 





  Print






News - Gadchiroli




Related Photos