महत्वाच्या बातम्या

 पुरुषाकरिता व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन : संंत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ संघाने केली घोषणा


विदर्भ न्युज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / अमरावती : स्वामी रामनंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड येथे १० ते १४ डिसेंबर २०२२ दरम्यान संपन्न होत असलेल्या पश्चिम विभाग आंतर विद्यापीठ व्हॉलीबॉल (पुरुष) स्पर्धेकरीता विद्यापीठाचा संघ घोषित झाला असून खेळाडूंचा प्रशिक्षण वर्ग डिग्री कॉलेज ऑफ फिजिटल एज्युकेशन, अमरावती याठिकाणी होणार आहे.
चमूमध्ये केशरबाई लाहोटी महाविद्यालय, अमरावतीचा आर्शद सिद्दीकी, विद्याभारती महाविद्यालय, अमरावतीचा मुफिज अब्दुल व यासिर खान, डी.सी.पी.ई., अमरावतीचा प्रणय बोरकर, आदर्श राऊत, मित्राजित बोरो व राहुल राय, एस.पी.एम. गिलानी महाविद्यालय, घाटंजीचा हरिवंश राठोड व पियुष जांभुळकर, जी.एस. टोम्पे महाविद्यालय, चांदुरबाजारचा गौरव भोंगाडे, महात्मा फुले महाविद्यालय, वरुडचा ओम भोसले, शिवाजी महाविद्यालय, अमरावतीचा संकेत देशमुख, एल.आर.टी. वाणिज्य महाविद्यालय, अकोलाचा सलमान खान पठान, शिवाजी महाविद्यालय, अकोलाचा निखील चव्हाण, कला व विज्ञान महाविद्यालय, कु­हाचा अभिजित दाभाडे, सिताबाई कला महाविद्यालय, अकोलाचा आनंद म्हस्के याची निवड करण्यात आली आहे.

  Print


News - Rajy
Related Photos