वनश्री महाविद्यालयात आरोग्य तपासणी व मार्गदर्शन शिबीर संपन्न
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / कोरची : वनश्री कला व विज्ञान महाविद्यालय कोरची येथे राष्ट्रीय सेवा योजना विभाग व ग्रामीण रुग्णालय कोरची यांच्या संयुक्त विद्यमाने मातृत्व सप्ताह निमित्याने *महीला आरोग्य तपासणी व मार्गदर्शन शिबीराचे* आयोजन करण्यात आले. या शिबीराप्रसंगी मार्गदर्शक म्हणून ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन बरडे, केदार मारवाडे व उमा देवांगण उपस्थित राहून विद्यार्थींनींना आरोग्य विषयक समस्यांवर मार्गदर्शन केले. जशे कुष्ठरोग, रक्ताशय, पोषण आहार, मासिक पाळी, कुमारी माता, वैयक्तिक स्वच्छता, सिकलसेल आजार इत्यादी. त्यानंतर विद्यार्थीनींची वयक्तीक तपासणी करण्यात आली. ६ मुलींना रक्ताची कमतरता असल्यामुळे त्यांना ग्रामीण रुग्णालय कोरची येथे भरती करण्यात आले. यावेळी महाविद्यालयाचे कार्यकारी प्राचार्य डाॅ. विनोद चहारे, डॉ एम. डब्लू. रुखमोडे, प्रा. रोटके, प्रा चापले, प्रा. मांडवे उपस्थित होते. यावेळी बहुसंख्येने विद्यार्थीनी उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घेतला.
News - Gadchiroli