महत्वाच्या बातम्या

 विकसित भारत युवा नेते संवाद प्रश्नमंजुषेत सहभागी होण्याचे आवाहन


- अमृता फडणवीस यांच्या हस्ते १०० विद्यार्थिनींना सायकलींचे वाटप

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : चंद्रपूर दौऱ्यावर आलेल्या अमृता देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते १०० शाळकरी विद्यार्थिनींना सायकलींचे वाटप करण्यात आले. आमदार किशोर जोरगेवार यांच्या पुढाकारातून गजानन निवासस्थानी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.शाळेत जाणाऱ्या विद्यार्थिनींचा प्रवास सुलभ व्हावा तसेच आर्थिक परिस्थितीमुळे त्यांच्या शिक्षणात अडथळे निर्माण होऊ नयेत, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. सायकली मिळाल्यानंतर विद्यार्थिनींच्या चेहऱ्यावर आनंदाचे वातावरण दिसून आले.

यावेळी अमृता फडणवीस यांनी विद्यार्थिनींशी संवाद साधत शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. मुलींनी शिक्षणाला प्राधान्य देत आत्मविश्वासाने पुढे जावे आणि आपल्या ध्येयाचा सातत्याने पाठपुरावा करावा, असे आवाहन त्यांनी केले.आमदार किशोर जोरगेवार म्हणाले की, चंद्रपूरच्या मुलींमध्ये गुणवत्ता आणि क्षमता मोठ्या प्रमाणात आहे. मात्र, अनेक विद्यार्थिनींना शाळेत जाण्यासाठी प्रवासाच्या अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे त्यांचा शाळेपर्यंतचा प्रवास सुलभ व्हावा आणि शिक्षणाची वाट अधिक सोपी व्हावी, यासाठी सायकल वाटपाचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.

 मुली शिकल्या तर कुटुंबासह समाजाची प्रगती निश्चित होते. चंद्रपूरमधील प्रत्येक मुलीला शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जातील, असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाला कल्याणी किशोर जोरगेवार यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते, विद्यार्थिनी तसेच पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.





  Print






Related Photos