भरधाव ट्रकने ३ विद्यार्थ्यांना चिरडले, एकाचा मृत्यू ,२ गंभीर जखमी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भिवापूर :
  नागपूर जिल्ह्यातील भिवापूर येथे भरधाव ट्रकने  ३ महाविद्यालयीन विध्यार्थ्यांना चिरडल्याची घटना घडली घडली आहे.  यात एका विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला.  तर २ विद्यार्थी जखमी झाले आहेत.  त्यातील एकाची परिस्थिती गंभीर असून त्याला नागपूर येथे हलविण्यात आले.  तर दुसरा मुलगा भिवापूर येथे रुग्णालयात उपचार घेत आहे. 
आज  शनिवारी सकाळी ११  वाजताच्या सुमारास राष्ट्रीय विद्यालय भिवापूर येथील विद्यार्थी सायकल ने  महाविद्यालयात जात असताना भरधाव ट्रकने त्यांना चिरडले.  महिनाभरापूर्वीच भिवापूर तालुक्यातील चिमूर - उमरेड मार्गावरील मालेवाडा या गावात टिप्परने २ शाळकरी मुलांना चिरडल्याची घटना ताजी असताना हा अपघात घडला आहे.  वाहन चालक घटनास्थळावरून पसार झाला असून संतप्त नागरिकांनी टायर जाळून चक्काजाम आंदोलन केले.  त्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.  भिवापूर मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.  पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत रस्त्यावरील आग विझवत संतप्त जमावाला शांत केले.   Print


News - Nagpur | Posted : 2018-09-15


Related Photos