महत्वाच्या बातम्या

 मदनी येथे कापूस खरेदीचा शुभारंभ : पहिल्याच दिवशी २०० क्विंटल आवक


- शेतकऱ्यांना ९,५१३ रुपये प्रतिक्विंटल दर; बाजार समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते खरेदीला सुरुवात

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा : वर्धा कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत मदनी येथील सियाराम कायबर्समध्ये नवीन हंगामातील कापूस खरेदीला सुरुवात झाली आहे. बाजार समितीचे उपसभापती पांडुरंग देशमुख आणि संचालक संदीप शिंदे यांच्या हस्ते कापूस खरेदीचा शुभारंभ करण्यात आला. पहिल्याच दिवशी केंद्रावर २०० क्विंटल कापसाची आवक झाली.

खरेदीच्या पहिल्या दिवशी कापूस विक्रीसाठी आणणारे मदनी येथील जीवन मुके, कापशी येथील सतीश गोहत्रे आणि पुजई येथील गजानन तमगिरे या शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला. या तिन्ही शेतकऱ्यांना त्यांच्या कापसासाठी ९ हजार ५१३ रुपये प्रतिक्विंटल दर देण्यात आला.

यावेळी जिनिंगचे मालक रमाकांत जाजोदिया, कापूस मापारी नमोद गावंडे यांच्यासह परिसरातील शेतकरी उपस्थित होते. नवीन हंगामातील खरेदी सुरू झाल्याने परिसरातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना आपला शेतमाल विक्रीसाठी सुविधा उपलब्ध झाली आहे.

दरम्यान, शेतकऱ्यांनी वर्धा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील परवानाधारक कापूस व्यापाऱ्यांकडेच कापूस विक्रीसाठी आणावा, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच, सर्व कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी कपास किसान अ‍ॅपच्या माध्यमातून भारतीय कापूस महामंडळाकडे (सीसीआय) कापूस विक्रीसाठी आवश्यक नोंदणी करून ठेवावी, असे आवाहन बाजार समितीचे सभापती, उपसभापती आणि संचालक मंडळाने केले आहे.





  Print






Related Photos