ढिसाळ नियोजन व बेजाबदार वक्तव्यामुळे मुरखळा चक वासीयांनी मुख्याध्यापकाला धरले धारेवर


- प्रशासन चांगले चालवा अन्यथा शाळा बंद करा, गावकऱ्यांची मागणी 
- प्रबुद्ध हायस्कुल मुरखळा चक येथील घटना 
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चामोर्शी
: गाव करेल ते राव करेल काय ? या म्हणीचा प्रत्यय काल  ७ ऑगस्ट रोजी मुरखळा चक येथील गावकऱ्यांनी आणून दिला. शालेय प्रशासन ढिसाळ व बेजाबदारपणे वक्तव्य व वागणुकीला कंटाळून बुद्ध हायस्कुल मुरखळा चक येथील मुख्याध्यापकाला गावकऱ्यांनी चांगलेच धारेवर धरले.  
मुरखळा चक येथे वर्ग ५ ते १० पर्यंत वर्ग असून मुख्याध्यापक बी.पी. खोब्रागडे आहेत. तसेच शालेय प्रशासन हाताळण्याची सर्वस्वी जबाबदारी असूनही त्यात कसूर दिसून येत असल्याने व विद्यार्थ्यांसोबत बोलतांना योग्य भाषेचा वापर आणि खिचडी प्रभार असलेल्या शिक्षकांवर व पोषण आहार शिजविणाऱ्या बाईवर चोरीचा आरोप यावरून विद्यार्थ्यांना एक दिवस पोषण आहारापासून वंचित राहावे लागल्याने गावकरी अतिशय संतप्त होऊन शाळेत आले . प्रशासन चांगले चालवा अन्यथा शाळा बंद करा असे खडे बोल सुनावून मुख्याध्यापकांना धारेवर धरले. 
यावेळी गावकऱ्यांसोबतच असलेले पो.पा अनिल कुकुडकर, सरपंचा मीनाक्षी वाळके, उपसरपंच पुनेश्वर दुधे, शाळा व्य. समिती अध्यक्ष भीमराव ठेमस्कार, उपाध्यक्ष कुमार लाकडे, सुभाष कुनघाडकर, सुकदेव भोयर, कुंदा बोरकर, अमोल मंगर, रवींद्र गायकवाड, हरीश वाळके, व शाळा व्य. स आणि शी.पा. संघाच्या सदस्यांनी सविस्तर माहिती दिली व प्रशासनात सुधारणा व नियमितता दिसून न आल्यास  रास्तारोको आंदोलन करून शाळा बंद करण्यात येईल असेही सांगितले. 
मुख्याध्यापक बी.पी. खोब्रागडे यांना विचारणा केली असता त्यांनी सर्वासमोर माफी मागून यापुढे कोणत्याही विद्यार्थ्यांवर अन्याय होणार नाही व सर्व शिक्षक,  शिक्षकेतर कर्मचारीही आपले कार्य पार पाडतील .  माझ्यावर अनेक कामांचा ताण असल्याने  कोणाच्या भावना दुखतवल्या असतीलही  परंतु आपला  तसा  मानस नसल्याचे  गावकऱ्यांना सांगितले. 

   Print


News - Gadchiroli | Posted : 2018-08-08


Related Photos