महत्वाच्या बातम्या

 समन्वयाने तक्रारी निकाली काढण्यासाठी लोकशाही दिन : डॉ. विपीन इटनकर


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / नागपूर : तक्रारदार व संबंधित विभाग यांच्यामध्ये समन्वय घडवून तक्रारीचे निराकरण करण्यासाठीच लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. नागरिकांनी योग्य माहिती तक्रारीसोबत जोडावी त्यामुळे वेळेत प्रकरण निकाली काढणे सोईचे होईल, असे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी सांगितले.

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन आज  जिल्हाधिकारी कार्यालयात बचत भवन येथे करण्यात आले. निवासी उपजिल्हाधिकारी विजया बनकर, उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोदवड तसेच संबंधित विभागाचे अधिकारी यासह तक्रारदार  यावेळी उपस्थित होते.

तक्रार अर्ज व निवेदन वैयक्तिक स्वरुपाचे आसावे. तालुकास्तरीय लोकशाही दिनातील तक्रार अर्जावर एक महिन्यात कार्यवाही न झाल्यास जिल्हास्तरीय लोकशाही  दिनात तक्रार अर्ज सादर करावा, असेही जिल्हाधिकारी यांनी सांगितले. यावेळी संबंधित तहसीलचे तहसिलदार यांच्याशी दूरदृष्यप्रणालीद्वारे चर्चा करुन प्रकरणाबाबत चर्चा करण्यात आली.

वनविभाग-1, नझूल-1, भूसंपादन-1, पोलीस विभाग-1, विद्युत विभाग-1 असे पाच प्रकरणांवर यावेळी चर्चा करण्यात आली.





  Print






News - Nagpur




Related Photos