महत्वाच्या बातम्या

 कुरुळ–तळोधी–जावड मार्गाच्या दुरुस्तीसाठी आमदार मिलिंद नरोटे यांना निवेदन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : कुरुळ–तळोधी–जवड पुलिया जुन्या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या रस्त्यावरून दररोज मोठ्या प्रमाणात नागरिकांची ये-जा सुरू असते. खड्ड्यांमुळे अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली असून, नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे.

या समस्येची तातडीने दखल घेऊन रस्त्यावर मुरूम टाकून खड्डे बुजवावेत व रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी करणारे निवेदन गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. मिलिंद रामजी नरोटे यांना देण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते सुरज पिपरे यांनी नागरिकांच्या या गंभीर समस्येकडे आमदारांचे लक्ष वेधून घेत, संबंधित विभागाला तातडीने सूचना देऊन रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी केली.

रस्त्यावरील खड्ड्यांमुळे नागरिकांच्या जीविला धोका निर्माण झाला आहे. प्रशासनाने याची तातडीने दखल घेऊन रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ता सुरज पिपरे यांनी केली. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी रस्त्याची दुरुस्ती लवकरात लवकर करण्यात यावी, अन्यथा रस्त्यावर उतरू अशी मागणी यावेळी करण्यात आली.





  Print






Related Photos