महत्वाच्या बातम्या

  चंद्रपूर बातम्या

नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघासाठी बल्लारपुरात ७४ टक्के मतदान : ३८ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद बातम्या - Chandrapur

नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघासाठी बल्लारपुरात ७४ टक्के मतदान : ३८ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद


विदर्भ न्यूज एक्सप्रेस तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत बल्लारपूर येथे आज उत्साहपूर्ण वातावरणात मतदान पार पडले. शहरातील तीन मतदान केंद्रांवर एकूण ७४ टक्क्यांच्या आसपास मतदानाची नोंद झाली. या निवडणुकीत एकूण ३८ उमेदवार आपले राजकीय भवितव्य आजमावत असून, मतदारांनी दिलेला कौल कोणाच्या बाजूने जाणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) यांच्या आघाडीकडून अभिजीत गोविंदराव वंजारी निवडणूक लढवत आहेत. तर भाजपप्रणीत युतीकडून सुधाकर कोहळे यांच्यासह अन्य उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. एकूण ३८ उमेदवार निवडणुकीत नशीब आजमावत असल्याने मतदारांचा कौल कोणाच्या बाजूने लागतो, याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली आहे.बल्लारपूर शहरात मतदानासाठी तहसील कार्यालय आ...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
दिव्यांगाच्या जगण्याचा आधार असलेली मोपेड चोरली : रामनगर पोलिसांनी चोरट्याला केले जेरबंद बातम्या - Chandrapur

दिव्यांगाच्या जगण्याचा आधार असलेली मोपेड चोरली : रामनगर पोलिसांनी चोरट्याला केले जेरबंद


विदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर : दिव्यांग व्यक्तीसाठी केवळ वाहन नव्हे, तर दैनंदिन जीवनातील अनेक अडचणींवर मात करण्याचे साधन असलेली मोपेडच चोरट्याने लंपास केली. दिव्यांग असल्याने विशेष बदल करून तयार केलेली होंडा अ‍ॅक्टिव्हा चोरीला गेल्याने बाळू पवार यांच्यासमोर मोठी अडचण निर्माण झाली. मात्र, रामनगर पोलिसांनी या प्रकरणाचा सातत्याने तपास करत चोरीची मोपेड शोधून काढली आणि संशयिताला ताब्यात घेतले. किशोर बाजीराव महाडोरे (वय ४२, रा. मेंडकी, ता. ब्रह्मपुरी) असे त्याचे नाव आहे. पोलिसांनी त्याच्याकडून ४० हजार रुपये किमतीची मोपेड जप्त केली.बालाजी वॉर्ड क्रमांक २, चंद्रपूर येथील बाळू तुकाराम पवार (वय ४९) हे दिव्यांग आहेत. त्यांच्या सोयीसाठी होंडा अ‍ॅक्टिव्हा मोपेडच्या मागील चाकाजवळ दोन अतिरिक्त चाके बसवून ती विशेष पद्धतीने तयार करण्यात आली होती. दैनंदिन जीवनातील कामे करण्यासाठी अश...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
कष्टाच्या कमाईची रिक्षा चोरट्याने पळविली : रामनगर पोलिसांनी रिक्षेसह चोरट्याला घेतले ताब्यात बातम्या - Chandrapur

कष्टाच्या कमाईची रिक्षा चोरट्याने पळविली : रामनगर पोलिसांनी रिक्षेसह चोरट्याला घेतले ताब्यात


विदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर : कष्टाने कमावलेल्या पैशांतून घेतलेली रिक्षा चोरीला गेल्याने मालकाचे मोठे नुकसान झाले. मात्र, रामनगर पोलिसांनी तत्परतेने तपासाची चक्रे फिरवून चोरीला गेलेली रिक्षा शोधून काढली आणि आरोपी शेख गफार रज्जाक शेख ३५ वर्ष , रा. दुर्गानगर, चंद्रपूर याला रिक्षेसह ताब्यात घेतले. या कारवाईत पोलिसांनी ८० हजार रुपये किमतीची रिक्षा जप्त करून चोरीच्या गुन्ह्याचा उलगडा केला.१६ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री ८ ते ११ वाजताच्या दरम्यान अनिल महादेव गुडे  ४५ वर्ष , रा. आंबेडकर नगर, बाबूपेठ, चंद्रपूर यांची एमएच ३४ डी ६९६३ क्रमांकाची तीनचाकी रिक्षा जिल्हा परिषदेजवळील पेट्रोल पंपासमोर उभी होती. याच दरम्यान अज्ञात व्यक्तीने रिक्षा चोरून नेली. कष्टाच्या कमाईचे साधन असलेली रिक्षा चोरीला गेल्याने गुडे यांचे नुकसान झाले. या प्रकरणी त्यांनी रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्य...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
ऑनलाइन बुक केलेल्या ४५ हजारांच्या मोबाईलऐवजी साबणाच्या वड्या : वरोऱ्यात फसवणुकीची घटना बातम्या - Chandrapur

ऑनलाइन बुक केलेल्या ४५ हजारांच्या मोबाईलऐवजी साबणाच्या वड्या : वरोऱ्यात फसवणुकीची घटना


विदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर : ऑनलाइन बुक केलेल्या ४४ हजार ९९९ रुपये किमतीच्या मोबाईलऐवजी पार्सलमध्ये साबणाच्या वड्या मिळाल्याची घटना वरोरा येथे घडली. या प्रकरणी अंशुल संजीवकुमार सक्सेना रा. गजानन नगर, सरदार पटेल वॉर्ड, वरोरा यांनी २२ ऑक्टोबर रोजी वरोरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीनुसार, अंशुल सक्सेना यांनी १६ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ७.५८ वाजता एमआयच्या अधिकृत वेबसाइटवरून रेडमी टर्बो ५ (१२ जीबी रॅम व २५६ जीबी स्टोरेज) हा मोबाईल ऑनलाइन बुक केला होता. या मोबाईलची किंमत ४४ हजार ९९९ रुपये असून, त्यांनी ऑनलाइन पद्धतीने पैसे भरले होते.२१ ऑक्टोबर रोजी त्यांच्या घरी पार्सल देण्यासाठी तोंडावर कापड बांधलेला एक व्यक्ती मोटारसायकलने आला. त्याने सक्सेना यांच्या पत्नी कल्पना यांना पार्सल आल्याचे सांगून ओटीपी मागितला. त्यावेळी अंशुल सक्सेना हे बीएसएनएल कार्यालयात का...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
सुरक्षा रक्षक मंडळाच्यावतीने २३ ऐवजी २६ ऑक्टोबर रोजी कागदपत्रे पडताळणी बातम्या - Chandrapur

सुरक्षा रक्षक मंडळाच्यावतीने २३ ऐवजी २६ ऑक्टोबर रोजी कागदपत्रे पडताळणी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर : चंद्रपूर जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाच्या कार्यक्षेत्रातील चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्याकरिता ३९६ सुरक्षा रक्षकांचा समुच्चय (पूल) तयार करण्यासाठी ऑनलाईन अर्ज केलेल्या उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी १२ ऑक्टोबर पासून कामगार कल्याण मंडळ, बंगाली कॅम्प, चंद्रपूर येथे सुरूआहे.तथापि 23 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या मतदान प्रक्रियेच्या अनुषंगाने सदर दिवशी कागदपत्रे पडताळणीसाठी उपस्थित राहण्याबाबत संदेश / ई-मेल प्राप्त झालेल्या संबंधित उमेदवारांनी २३ ऑक्टोबर ऐवजी २६ ऑक्टोबर २०२६ रोजी नियोजित स्थळी सकाळी १० वाजता उपस्थित राहावे, असे आवाहन चंद्रपूर सुरक्षा रक्षक मंडळ, चंद्रपूर मार्फत करण्यात येत आहे. २३ ऑक्टोबर रोजी कोणतीही कागदपत्रे पडताळणी करण्यात येणार नाही, याची सर्व संबंधित उमेदवारांनी नोंद घ्यावी.

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
चाकू हल्ला करून खुनाचा प्रयत्न : आरोपीला पाच वर्षे सश्रम कारावास बातम्या - Chandrapur

चाकू हल्ला करून खुनाचा प्रयत्न : आरोपीला पाच वर्षे सश्रम कारावास


विदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर : किरकोळ वादातून तरुणावर चाकूने हल्ला करून त्याच्या खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालय, चंद्रपूर यांनी आरोपी शिवशांत ऊर्फ भिसू दामोदर भुर्रे याला पाच वर्षे सश्रम कारावास आणि १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. के. लाहोटी यांच्या न्यायालयाने गुरुवार, २२ ऑक्टोबर २०२६ रोजी हा निकाल दिला. दंडाची रक्कम न भरल्यास आरोपीला एक महिन्याचा साधा कारावास भोगावा लागणार आहे.या प्रकरणातील माहितीनुसार, २ जानेवारी २०२० रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास सावलगाव येथील महेश प्रमोद तलमले १८ वर्ष हा आपल्या दोन मित्रांसोबत भाजीपाला खरेदी करण्यासाठी ब्रह्मपुरी येथील गुजरी वॉर्डात गेला होता. यावेळी सरकारी रुग्णालयाजवळ हनुमाननगर, ब्रह्मपुरी येथील रहिवासी असलेल्या शिवशांत ऊर्फ भिसू दामोदर भुर्रे २१ वर्ष याने महेशसोबत असलेल्या...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
जिल्ह्यातील ४ लक्ष ९० हजार बालकांना जंतनाशक गोळ्या देण्याचे नियोजन बातम्या - Chandrapur

जिल्ह्यातील ४ लक्ष ९० हजार बालकांना जंतनाशक गोळ्या देण्याचे नियोजन


- २७ ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय जंतनाशक दिन मोहीमविदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर : बालकांचे आरोग्य व पोषणस्थिती सुधारण्यासोबतच कृमी संसर्गाचे प्रमाण कमी करून बालकांचा शारीरिक व बौद्धिक विकास साधण्याच्या उद्देशाने चंद्रपूर जिल्ह्यात २७ ऑक्टोबर २०२६ रोजी राष्ट्रीय जंतनाशक दिन मोहीम आणि 3 नोव्हेंबर रोजी मॉप-अप दिन राबविण्यात येणार आहे. या मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हा कृतीदल समितीची बैठक जिल्हाधिकारी वसुमना पंत यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच घेण्यात आली.बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंग, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अशोक कटारे, शल्य चिकित्सक डॉ.भास्कर सोनारकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. नयना उत्तरवार, शिक्षणाधिकारी अश्विनी सोनावणे जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ.स्नेहल कासारे उपस्थित होते.राष्ट्रीय जंतनाशक दिन कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भाग तसेच च...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
सेवा संकल्प अभियानांतर्गत ३५ बालकांवर यशस्वी शस्त्रक्रिया बातम्या - Chandrapur

सेवा संकल्प अभियानांतर्गत ३५ बालकांवर यशस्वी शस्त्रक्रिया


- राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाचा स्तुत्य उपक्रमविदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर : जन्मजात व्यंग, विविध आजार आणि शारीरिक दोषांमुळे अडचणींचा सामना करणाऱ्या बालकांना निरोगी जीवनाची संधी मिळावी, यासाठी आरोग्य विभागा मार्फत राबविण्यात आलेल्या सेवा संकल्प अभियानात एकूण ३५ बालकांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्या. या उपक्रमामुळे गरजू बालकांना वेळेवर उपचार मिळण्यास मदत झाली असून त्यांच्या कुटुंबियांना मोठा दिलासा मिळाला आहे.राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम अंतर्गत अंगणवाडीतील ० ते ६ वर्षे वयोगटातील बालके तसेच शासकीय व निमशासकीय शाळांमधील ६ ते १८ वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांची नियमित आरोग्य तपासणी केली जाते. या तपासणीदरम्यान जन्मजात व्यंग, जीवनसत्त्वांची कमतरता, बालवयातील विविध आजार तसेच विकासात्मक विलंब व अपंगत्व आढळणाऱ्या बालकांना पुढील तपासणी, उपचार आणि आवश्यक शस्त्रक्रियांसाठ...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
चंद्रपुरात एम.डी. ड्रग्जची विक्री : स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई, २८ वर्षीय तरुण ताब्यात बातम्या - Chandrapur

चंद्रपुरात एम.डी. ड्रग्जची विक्री : स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई, २८ वर्षीय तरुण ताब्यात


विदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर : शहरात अमली पदार्थांच्या अवैध विक्रीविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने धडक कारवाई करत एम.डी. मेफेड्रोन ड्रग्ज पावडरसह एका २८ वर्षीय तरुणाला ताब्यात घेतले. शानवाज उर्फ शानू इस्माईल शेख २८ वर्षे रा. अहमदिया मस्जिदजवळ, रामाळा तलाव, चंद्रपूर असे ताब्यात घेतलेल्या तरुणाचे नाव आहे. या कारवाईत ६.७३० ग्रॅम एम.डी. ड्रग्ज पावडर, मोबाईल आणि रोख रकमेसह एकूण ४२ हजार ३१० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणात नागपूरमधून अमली पदार्थ आणल्याची माहिती प्राथमिक तपासात समोर आली असून, तस्करीच्या जाळ्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.२१ ऑक्टोबर २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक चंद्रपूर शहरात गस्त घालत असताना गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की, रामाळा तलाव परिसरातील एक व्यक्ती एम.डी. ड्रग्ज पावडर विक्री करण्याच्या उद्देशाने जमनजे...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
रात्री उशिरापर्यंत विनापरवानगी डीजेचा दणदणाट : तिघांविरुद्ध गुन्हा दाखल, ११ लाखांचा मुद्देमाल जप्त बातम्या - Chandrapur

रात्री उशिरापर्यंत विनापरवानगी डीजेचा दणदणाट : तिघांविरुद्ध गुन्हा दाखल, ११ लाखांचा मुद्देमाल जप्त


विदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर : सण-उत्सवाच्या नावाखाली ध्वनिप्रदूषणाच्या नियमांना हरताळ फासून रात्री उशिरापर्यंत मोठ्या आवाजात डीजे वाजविणाऱ्यांविरुद्ध रामनगर पोलिसांनी कारवाई केली. निर्धारित वेळेचे उल्लंघन करून तसेच आवश्यक परवानगीशिवाय डीजे वाजविल्याप्रकरणी डीजे मालकासह सर्वोदय शारदा महिला मंडळाच्या अध्यक्ष व उपाध्यक्षांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत डीजेची उपकरणे आणि वाहन असा एकूण ११ लाख ५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.२१ ऑक्टोबर रोजी देवी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर ध्वनिप्रदूषणाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यासाठी रामनगर पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी गस्त घालत होते. यावेळी रात्री सुमारे ११.३० वाजताच्या सुमारास आदर्श पेट्रोल पंपामागे, इंडस्ट्रियल इस्टेट परिसरातील कबरा इंजिनिअरिंगसमोर मोठ्या आवाजात डीजे वाज...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →