महत्वाच्या बातम्या

  नैतिकतेच्या आधारावर सुशिक्षितांनी स्पर्धेकडे वळावे


- धर्मवीर सालविठ्ठल : प्रबोधन व संगीतमय कार्यक्रम

विदर्भ न्यूज एक्सप्रेस

प्रतिनिधी / देसाईगंज : देशात बेरोजगारीचे प्रमाण बेसुमार आहे. त्यातही गडचिरोली जिल्ह्यात रोजगाराचे साधन पाहिजे त्या प्रमाणात उपलब्ध नाही. त्यामुळे योग्य मार्गदर्शना अभावी बेरोजगार युवक नको त्या कामात भरकटत आहेत. अशा युवकांनी स्पर्धा परीक्षेकडे वळावे किंवा व्यवसायाकडे वळावे, पाहिजे त्याठिकाणी आम्ही मार्गदर्शन करण्यास तयार आहोत, असे प्रतिपादन वडसा वन विभागाचे उपवनसंरक्षक धर्मवीर सालविठ्ठल यांनी केले.  १६ ऑक्टोबर २०२२ रोजी देसाईगंजच्या आर्यसत्य बुद्धविहारात आयोजित प्रेम धांदे यांच्या प्रबोधनपर वडसा येथे आयोजित कार्यक्रमात उपस्थित कार्यक्रमाच्या उद्घाटनीय समारंभात अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त कार्यकारी उद्घाटक म्हणून ते बोलत होते. अभियंता विजय मेश्राम होते. सहउद्घाटक म्हणून प्राचार्य अनिल थुल तर प्रमुख पाहुणे म्हणून क्षेत्र सहायक वन अधिकारी रमेश घुटके,सामाजिक विचारवंत चंद्रशेखर बांबोळे, पत्रकार पुरुषोत्तम भागडकर, बुद्धिस्ट सोसायटीचे विभागीय अध्यक्ष विजय बन्सोड, बौद्ध समाज कोअर कमिटीचे अध्यक्ष प्रकाश सांगोळे, सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण नागदेवते, प्रा. डॉ. मिथुन राऊत, पिंकू बावणे, वंदना धोंगडे, बौद्ध भिख्खू धम्मप्रिय, बौद्ध भिख्खू संघप्रिय धम्मज्योती आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.औद्योगिक प्रशिक्षण संस्था, देसाईगंज येथील विद्यार्थी सुशील हेडाऊ हा देशात प्रथम आल्याने त्याचा शाल व पुष्पगुच्छ देऊन उपवनसंरक्षक सालविठ्ठल यांच्या हस्ते सत्कार केला. मुंबईचे प्रबोधनकार प्रेम धांदे यांनी भीम गीत, रमाई गीत, अंधश्रद्धा निर्मूलनपर गीते, राजे छत्रपती राजे संभाजी यांच्या शौर्याची गीते गाऊन रसिकांना मंत्रमुग्ध केले. प्रास्ताविक पवन गेडाम यांनी केले तर संचालन अरविंद घुटके यांनी केले.





  Print






News - Gadchiroli




Related Photos