महत्वाच्या बातम्या

 वैरागड ठरतेय बनावट व सुंगधित तंबाखूची राजधानी


- आरमोरीत बस्तान ठोकून सलीम नामक तस्कर हलवितोय तस्करीचे सूत्रे  

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधि / गडचिरोली : राज्यात प्रतिबंधित मादक पदार्थ विक्रीवर प्रतिबंध घालण्यात आला असला तरी गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणत प्रतिबंधित तंबाखू तस्करी केला जात आहे. आरमोरी तालुक्यातील वैरागड ही तंबाखू तस्करीची राजधानी ठरत आहे. सलीम नामक तस्कर आरमोरीत बस्तान ठोकून तस्करीची सूत्रे हलवित असल्याचे बोलल्या जात आहे. 

उद्योग विरहित गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांचे जीवनमान उंचावण्याचा उद्दांत हेतून जिल्ह्यात अथक प्रयत्नांती २ ऑक्टोंबर १९९२ पासून राज्य शासनाला मिळणाऱ्या कोट्यवधी रुपयांच्या महसुलावर पाणी फेरण्यास भाग पाडून दारूबंदी लागू करण्यात आली. त्याच धर्तीवर सुगंधित तंबाखूच्या सेवनाने दरवर्षी कॅन्सर सारख्या गंभीर आजाराने लाखो लोक मृतमुखी पडत असल्याची सबब पुढे करून २०१२ पासून सुगंधित तंबाखूव तत्सम मादक पदार्थाच्या वाहतूक व विक्रीवर बंदी घालण्यात आली. मात्र, जिल्ह्यात लगतच्या राज्यातून बेधडक वाहतूक करून प्रतिबंधित तंबाखूची सर्रास विक्री केल्या जात असल्याचे धक्कादायक वास्तव आहे. जिल्ह्यात प्रतिबंधित तंबाखू तस्करीनेही हैदोस घालण्यास प्रारंभ केला आहे. आरमोरी स्थित निवासी वैरागड येथील सलीम या नावाने ओडखला जाणारा व्यक्ती सुगंधित व बनावट तंबाखू तस्कर दुकानाच्या आड दर दिवशी चारचाकी वाहनाने लाखोंचा प्रतिबंधित तंबाखू बेधडकपणे आरमोरी तालुक्यासह जिल्हाभरात विक्री करण्यास यशस्वी होत आहे. मादक पदार्थाच्या सेवनाने मोठ्या प्रमाणात दुष्परिणाम होत असल्याने नव्याने रुजू झालेले पोलीस अधीक्षक निलोत्पल यावर काय करवाई करतात. याकडे सद्या सर्वांचे लक्ष लागल्याचे दिसून येत असून प्रतीबांधित तंबाखू तस्करास जेरबंद करावे अशी मागणी होत आहे.





  Print






News - Gadchiroli




Related Photos