महत्वाच्या बातम्या

 देसाईगंज येथील अतिक्रमणाने व्यापला राज्य महामार्गावरील चौक


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / देसाईगंज : देसाईगंज शहराच्या भुयारी पुलाच्या अगदी तोंडावर जिथून वाहने वळून मुख्य बाजारपेठेत वा कुरखेडाकडे जात असतात. त्याच ठिकाणी सध्या रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात अतिक्रमण वाढत असल्याने अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. सध्या देसाईगंज शहराचा विस्तार मोठ्या प्रमाणात होत आहे. रेल्वेचा भुयारी पूल आवागमनासाठी सुरू झाला आहे. तेव्हापासून कुरखेडा टी पाईवरून जो फाटकेचा मार्ग होता, तो बंद झाल्याने त्या ठिकाणी मोठी मोकळी जागा निर्माण झाली. त्याच्याविरुद्ध बाजूस कापडाचे मा ल्स आहेत. त्याच्या अगदी समोरील वरच्या फाटकबंदमुळे जी मोकळी स्पेस होती. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालेले दिसून येत आहे. देसाईगंज बसस्थानकाचा पसारा हा आरमोरी कुरखेडा राज्य महामार्गावरच आहे. साकोली, चंद्रपूर, वडसा, ब्रह्मपुरी, गडचिरोली, भंडारा आदी बसेस स्थानकावर येऊन विरुद्ध बाजूस असणाऱ्या बायपासने न्याव्या लागत असल्याने या बसेसना कुरखेडा टी पॉइंटवरून टर्न घ्यावा लागतो. भुयारी पूल झाल्याने फाटकेचा मार्ग बंद झाला आहे. त्यामुळे त्या ठिकाणी मोठा स्पेस निर्माण झालेला होता. पुलाच्या अगदी वाहने वळण्याच्या ठिकाणावरच अनेक दुकाने, हा टेल्स, पान टपरी लावून बसलेले असल्याने एस.टी. बसेस, मालवाहू ट्रक, चारचाकी गाड्या यांना त्या ठिकाणाहून वळविण्यास स्पेसच उपलब्ध राहिलेला नाही. सदर अतिक्रमण हटविणे आवश्यक झाले आहे. वाहतुकीला अडथळा होत असतानाही या अतिक्रमणावर नगर परिषद कोणतीही कारवाई करीत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. देसाईगंज पोलीससुद्धा याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे.





  Print






News - Gadchiroli




Related Photos