महत्वाच्या बातम्या

 सरकार रद्द करणार १० लाख रेशन कार्ड : या लोकांना मिळणार नाही मोफत धान्य


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / मुंबई : देशभरातील कोट्यवधी लोक मोफत सरकारी रेशनचा लाभ घेत आहेत. पण आता सरकार चुकीच्या मार्गाने रेशन मिळवणाऱ्या लोकांचे रेशन बंद करणार आहे. सरकारने अलीकडेच देशभरातून 10 लाख बनावट शिधापत्रिका ओळखल्या आहेत. या शिधापत्रिका लवकरच रद्द करून त्यांच्या रेशनवर पूर्णपणे बंदी घालण्यात येणार आहे. ज्यांची शिधापत्रिका बनावट असल्याचं आढळून आले, त्यांच्याकडून सरकार रेशनची वसूलीही करणार आहे.

वास्तविक, देशभरातील 80 कोटींहून अधिक लोक मोफत रेशन कार्डचा लाभ घेत आहेत. पण ही सुविधा घेण्यास पात्र नसलेले करोडो लोक देशात आहेत. असे असतानाही ते वर्षानुवर्षे मोफत रेशन सुविधेचा लाभ घेत आहेत. अलीकडेच सरकारने 10 लाख अपात्र शिधापत्रिकाधारकांची ओळख पटवली आहे. ज्यांना यापुढे गहू, हरभरा आणि तांदूळ मोफत मिळणार आहे.

अपात्र शिधापत्रिकाधारकांची यादी शिधावाटप विक्रेत्यांना पाठवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. रेशन विक्रेते नावे चिन्हांकित करतील आणि अशा कार्डधारकांचा अहवाल जिल्हा मुख्यालयाला पाठवतील. त्यानंतर त्यांची कार्डे रद्द केली जातील. जे लोक मोफत रेशन मिळण्यास पात्र आहेत त्यांनाच रेशन मिळेल.

NFSA नुसार जे कार्डधारक आयकर भरतात. याशिवाय ज्यांच्याकडे 10 एकरापेक्षा जास्त जमीन आहे. अशा लोकांची यादीही तयार केली जात आहे. त्याचबरोबर अशा लोकांचाही शिधापत्रिका रद्द करणाऱ्यांमध्ये समावेश आहे, ज्यांनी गेल्या 4 महिन्यात मोफत रेशन घेतलेले नाही. त्याचबरोबर काही लोक असे आहेत जे मोफत रेशनचा व्यवसाय करतात. अशा लोकांचीही सरकारकडे यादी आहे. बनावट मार्गाने शिधापत्रिका वापरणाऱ्यांची सर्वाधिक संख्या यूपीमध्ये समोर आली आहे. मात्र, तरीही शिधापत्रिकाधारकांची पात्रता तपासण्याचे काम सुरू आहे.





  Print






News - Rajy




Related Photos